IND VS ENG 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील 5 वा सामना हा ओव्हल मैदानावर खेळवला जातोय. या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी टीम इंडियाचा (Team India) स्टार सलामी फलंदाज यशस्वी जयस्वालने (Yashavi Jaiswal) दमदार शतक ठोकलं. हे त्याच टेस्ट क्रिकेटमधील सहावं शतक होतं, मात्र यशस्वीच्या शतकानंतर त्यानं केलेलं सेलिब्रेशन खूप गाजलं. सध्या त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ओव्हल मैदानावर दुसऱ्या दिवशी भारताने इंग्लंडला त्यांच्या पहिल्या इनिंगमध्ये 247 धावांवर रोखले. इंग्लंडने केवळ 23 धावांची आघाडी घेतली होती. जी आघाडी दुसऱ्या इनिंगची फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाच्या फलंदाजांनी मोडीत काढली. केएल राहुल आणि साई सुदर्शनच्या विकेटनंतर यशस्वी जयस्वाल आणि आकाश दीप या दोघांनी भारताचा डाव सावरला. दुसऱ्या दिवसाच्या अंती भारताची धावसंख्या 75 धावांवर दोन विकेट अशी होती. तिसऱ्या दिवसाला सुरुवात झाल्यावर यशस्वी आणि आकाशने पुन्हा फटकेबाजी करायला सुरुवात केली. यावेळी आकाश दीप 66 धावा करून बाद झाला तर यशस्वीने शतक पूर्ण केले.
यशस्वीने ठोकलेले हे शतक टेस्ट क्रिकेटमधील त्याचे सहावे शतक होते. यशस्वीने शतक पूर्ण केल्यावर हातातील ग्लव्हज काढले आणि फ्लाईंग किस दिली त्यानंतर त्याने हार्ट देखील बनवलं. पण यशस्वीने हा इशारा नेमका कोणाला केला हे अजून गुलदस्त्यात आहे. काही नेटकऱ्यांच्या मते हा इशारा त्याने ड्रेसींग रूमच्या दिशेने केला असावा असं त्यांचं मत आहे.
In a class of his own SonySportsNetwork ENGvIND NayaIndia DhaakadIndia TeamIndia ExtraaaInnings | ybj_19 pic.twitter.com/dLCc4Iq4iN
Sony Sports Network (SonySportsNetwk) August 2, 2025
पाचव्या टेस्टसाठी भारताची प्लेईंग 11 कशी आहे?
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), करुण नायर, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकिपर), वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, प्रसीद कृष्णा, मोहम्मद सिराज
पाचव्या टेस्टसाठी इंग्लंडची प्लेईंग 11 कशी आहे?
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (कर्णधार), जो रूट, हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, गस अॅटकिन्सन, जेमी ओव्हरटन, जोश टंग
भारताने ओव्हल मैदानावर आतापर्यंत किती सामने जिंकेल?
ओव्हल मैदानावर भारताने आतापर्यंत एकूण 15 टेस्ट सामने खेळले आहेत. यापैकी केवळ दोन सामने टीम इंडियाने जिंकलेत.