Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND VS ENG : यशस्वीने मैदानात केली रिझवान सारखी अ‍ॅक्टिंग, पाहून हसू लागले इंग्लंडचे खेळाडू

IND VS ENG 5th Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली यातील पाचवा सामना ओव्हल स्टेडियमवर खेळवला जात असून शनिवारी या सामन्याचा तिसरा दिवस होता.

IND VS ENG : यशस्वीने मैदानात केली रिझवान सारखी अ‍ॅक्टिंग, पाहून हसू लागले इंग्लंडचे खेळाडू

IND VS ENG 5th Test : भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंड विरुद्ध ओव्हल टेस्ट सामन्यात तिसऱ्या दिवशी जबरदस्त कामगिरी केली. टीम इंडियाचा सलामीवीर फलंदाज यशस्वी जयस्वालने शतकीय खेळी केली आणि 396 धावांचा स्कोअर उभा केला. यशस्वीच्या या शतकामुळे भारताने विजयासाठी 374 धावांचं मोठं टार्गेट इंग्लंड समोर ठेवलं. यशस्वी जयस्वालने 164 बॉलमध्ये 118 धावांची कामगिरी केली. या खेळी दरम्यान त्याने 14 चौकार आणि 2 षटकार सुद्धा लगावले. यशस्वी जयस्वालने (Yashavi Jaiswal) 296 मिनिटं क्रीजवर घालवली. 

मैदानात भारतासाठी उत्तम खेळी करताना यशस्वी जयस्वालच्या पायात थोडा कडकपणा आला. यशस्वी जयस्वाल काही मिनिटांचा ब्रेक घेऊन पाय सरळ करण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा कॅमेरामनने इंग्लंडच्या एका खेळाडूवर फोकस केला, जो यशस्वीला पाहून हसत होता. कारण यशस्वीचं होता जो इंग्लंडच्या समोर मजबूत भिंत बनून उभा होता आणि त्यालाच अचानकपणे ब्रेक घेताना पाहून इंग्लंडच्या खेळाडूंना राग येत होता. कारण तिसऱ्या टेस्टमध्ये जॅक क्राउली सुद्धा या प्रकारे दुखापतीची अ‍ॅक्टिंग करून वेळ वाया घालवत असताना दिसला होता, त्यानंतर खूप वाद निर्माण झाला होता. 

यशस्वीला पाहून हसत होते इंग्लंड खेळाडू : 

यशस्वीला त्याच्या पायात हॅमस्ट्रिंग सारखं वाटत होत, पण ज्या प्रकारे त्याने पायाला पकडलं होतं आणि परत फलंदाजीसाठी गेला, हे पाहून अनेकांना पाकिस्तानचा विकेटकिपर फलंदाज मोहम्मद रिझवानची आठवण आली. यशस्वीला असं करताना पाहून इंग्लंडचे फिल्डर्स काही करू शकत नव्हते. त्यांना यशस्वी पुन्हा फलंदाजीला सुरुवात करण्याची वाट पाहण्यावाचून काहीही पर्याय नव्हता. सध्या यशस्वीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.  

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

हेही वाचा : आशिया कप 2025 साठी टीम इंडियात 'या' 15 खेळाडूंची होऊ शकते निवड, तर 'हे' खेळाडू होणार बाहेर

मोहम्मद रिझवानने सुद्धा केली होती अ‍ॅक्टिंग : 

इंग्लंड विरुद्ध ओव्हल मैदानावरील सामन्यादरम्यान पूर्णपणे असं म्हणता येणार नाही की मोहम्मद रिझवान दुखापतीची अ‍ॅक्टिंग करत होते. पण मोहम्मद रिझवानने आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 मध्ये श्रीलंका विरुद्ध एका सामन्यात असं केलं होतं. तेव्हा रिझवानने फलंदाजी करताना वेळ वाया घालवण्यासाठी केलेल्या हॅमस्ट्रिंग दुखापतीच्या अ‍ॅक्टिंगबद्दल त्याची सोशल मीडियावर खूप खिल्ली उडवण्यात आली होती.  

Read More