Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind Vs Eng : बेअरस्टो आणि स्टोक्सची तुफानी खेळी, इंग्लंडचा 6 विकेटने विजय

दुसर्‍या वनडेत भारताचा 6 विकेटने पराभव झाला आहे.

Ind Vs Eng : बेअरस्टो आणि स्टोक्सची तुफानी खेळी, इंग्लंडचा 6 विकेटने विजय

पुणे : इंग्लंडने दुसर्‍या वनडेत भारताचा 6 विकेटने पराभव केला आहे. सामन्यात जॉनी बेअरस्टो 124 धावा आणि बेन स्टोक्सच्या 99 धावांच्या खेळीच्या जोरावर भारताला 6 विकेट्सने पराभूत केले. या विजयासह इंग्लंडने 3 सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी साधली आहे.

पुण्याच्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर भारताने दिलेल्या 337 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाने  39 बॉल मागे सोडत आणि 6 विकेट राखत विजय मिळविला. लियाम लिव्हिंग्स्टोनने 21 बॉलमध्ये 27 धावांवर नाबाद खेळी केली तर डेव्हिड मलानने 23 बॉलमध्ये 16 धावा ठोकला.

भारतासाठी प्रसिद्ध कृष्णाने सर्वाधिक 2 विकेट घेतल्या. भारताकडून कुलदीप यादवने 10 ओव्हरमध्ये कोणतीही विकेट न घेता 84 धावा दिल्या. या मालिकेचा तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना पुण्यात 28 मार्च रोजी खेळला जाणार आहे.

भारतीय संघाने 50 ओव्हरमध्ये 6 विकेट गमवत 336 रन केले होते. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक 108 रन केले. तर रोहित शर्माने 25, शिखर धवनने 4, विराट कोहलीने 66, ऋषभ पंतने 77, हार्दिक पांड्याने 35 तर कृणाल पांड्याने 12 रन केले.

Read More