IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना सध्या बर्लिंघमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जातोय. यात भारताने इंग्लंड समोर विजयासाठी 608 धावांचं मोठं आव्हान दिलंय. पाचव्या दिवशी हे आव्हान इंग्लंडपूर्ण करत का हे पाहून महत्वाचं ठरणार आहे. यापूर्वी इंग्लंडने पहिला टेस्ट सामना जिंकून सीरिजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. आता भारताला सीरिज बरोबरीत आणण्याची संधी आहे. अशातच तिसऱ्या टेस्ट सामन्यापूर्वी मीडिया रिपोर्ट्समधून रोहित आणि विराटच्या फॅन्ससाठी आनंदाची बातमी समोर येत आहे.
स्टार फलंदाज विराट कोहली आणि माजी टेस्ट कर्णधार रोहित शर्मा या दोघांनी भारत - इंग्लंड टेस्ट सामन्यासाठी टीम इंडियाची घोषणा होण्यापूर्वी टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. ज्यामुळे त्यांचे फॅन्स नाराज झाले. विराट आणि रोहित आता केवळ वनडे फॉरमॅटमध्ये खेळताना दिसतील. मात्र विराट आणि रोहित हे दोघे भारत - इंग्लंड तिसऱ्या टेस्ट सामन्यादरम्यान लॉर्ड्स मैदानात दिसू शकतात. विराट आणि रोहित हे दोघे सध्या लंडनमध्ये राहत आहेत. त्यामुळे बीसीसीआय त्या दोघांना लॉर्ड्स मैदानावर होणारा तिसरा टेस्ट सामना पाहण्यासाठी आमंत्रित करणार असल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून समोर येत आहे.
विराटने आतापर्यंत क्रिकेटचे तीनही फॉरमॅट मध्ये एकूण 539 सामने खेळले आहेत. विराटने त्याच्या टेस्ट करिअरमध्ये 123 सामन्यांमध्ये एकूण 9230 धावा केल्या आहेत. यात त्याने 30 शतक, 7 द्विशतक आणि 31 अर्धशतक केली आहेत. तर रोहित शर्माने 67 टेस्ट सामने खेळले असून यात त्याने 4301 धावा केल्या आहेत. यात त्याने १ टेस्ट द्विशतक, 12 शतक आणि 18अर्धशतक केली आहे.
(@rushiii_12) July 5, 2025
"Both Rohit Sharma and Virat Kohli are currently in London. BCCI may invite both of them to watch the third Test match to be held at Lord's Cricket Stadium." pic.twitter.com/DK35PDhVDR
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर
यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, करुण नायर, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, आकाश दीप, मोहम्मद सिराज, प्रसीद कृष्णा