Gautam Gambhir Viral Video: कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. क्रिकेट विश्वात तर अनेक गोष्टी व्हायरल होत असतात. असंच काहीस गौतम संभीर सोबत झाले आहे. एजबेस्टनमध्ये सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ ऐतिहासिक विजयाच्या उंबरठ्यावर उभा आहे. दरम्यान, टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतोय, ज्यात ते खेळाडूंना प्लेइंग XI मधून कसे काढून टाकतात, हे मिश्कीलपणे सांगताना दिसत आहे.
हा किस्सा द कपिल शर्मा शोवर घडला होता. इंग्लंड दौऱ्यापूर्वी गौतम गंभीर, ऋषभ पंत, युजवेंद्र चहल आणि अभिषेक शर्मा शोमध्ये सहभागी झाले होते. तिथे हास्याच्या धुमाळीत गंभीरचा हलकाफुलका अंदाज पाहायला मिळाला.
शोदरम्यान कपिल शर्माने ऋषभ पंतला चिडवत विचारलं, "आयपीएल 2025 मध्ये तुला 27 कोटी मिळाले, पण फारसे रन झाले नाहीत. जे कमी पैशात खेळले ते भारी खेळले. मग तू त्यांना म्हणतोस का, ‘थोडे पैसे घे पण जरा कमी रन कर’?" पंतनेही लगेच त्यावर उत्तर दिलं की, "तुमच्यासोबत स्टेजवर कोणी भारी परफॉर्म केलं तर तुम्ही काय म्हणता?" यावर कपिल म्हणाला, "मी त्याचं सीनच कापून टाकतो!"
तेव्हा गंभीरने हसत हसत टाकलेलं वाक्य होतं की, "तू पण बोल, त्याला मी ड्रॉप करतो!" यावर स्टुडिओमध्ये एकच हशा पिकला. शोमध्ये गंभीरने मस्त मस्करी करत सगळ्यांना हसवलं.
आज एजबेस्टनवरचा शेवटचा दिवस आहे. भारताला विजयासाठी फक्त 7 गडी बाद करायचे आहेत. इंग्लंडसाठी सामना वाचवणं जवळपास अशक्य झालं आहे. शुभमन गिलने दोन्ही डावात मिळून 430 धावा (269 आणि 161) ठोकल्या आहेत. हा एकाच टेस्टमध्ये भारतीय खेळाडूनं केलेला सर्वाधिक धावांचा विक्रम आहे. आणि तो जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे अशा कामगिरीसाठी. जर भारत हा सामना जिंकला, तर एजबेस्टनवरची त्यांची पहिली कसोटी विजय नोंदवली जाईल. हा एक ऐतिहासिक क्षण असेल.