IND vs ENG Updates : भारतीय क्रिकेट (Indian cricket team) संघातील वेगवान गोलंदाज अशी ओळख असणारा आणि सध्या संघातील अनुभवी खेळाडू म्हणून गणल्या जाणाऱ्या मोहम्मद सिराजनं त्याच्यावर असणारी जबाबदारी ओळखली आहे, असंच अनेक क्रिकेटप्रेमी सोशल मीडियावर म्हणत आहेत.
व्हायरल होणाऱ्या (Viral Video) या व्हिडीओमध्ये सिराज नवख्या आकाशदीपला धीर देत त्याचा आत्मविश्वास वाढवताना दिसत आहे. आकाशदीप लँडिंग एरियामुळं काहीसा चिंतित आणि नाखूष दिसला आणि यामुळं त्याच्या गोलंदाजीवर परिणाम होत असल्याचं सिराजच्या लक्षात आलं. मुख्य म्हणजे हा मुद्दा पंचांपर्यंसुद्धा पोहोचला.
दोन षटकांमध्ये आकाशनं Ben Duckett आणि Ollie Pope यांना बाद केल्यानंतर पाचव्या षटकावेळी हा प्रकार घडला. जिथं, सतत लँडिंग एरियामध्ये काही त्रुटी असल्यानं आकाशच्या गोलंदाजीवर यामुळं परिणाम पडताना दिसला. तिथं असणाऱ्य़ा रवींद्र जडेजा आणि के.एल.राहुलनंसुद्धा याकडे लक्ष दिलं. तितक्यातच सिराजनं तिथं येत ‘दिमाग मे मत रख, ठिक है?’ असं म्हणत आकाशदीपचं लक्ष विचलित करत त्याला धीर दिला.
‘डोक्यात काही ठेवू नकोस, ठीक आहे? आहे हे असं आहे आता... काय करु शकतो? असं आकाशदीपला सिराजनं म्हटल्याचं स्टंप माईकनं हेरलं आणि या क्षणाचा व्हिडीओसुद्धा व्हायरल झाला. पहिलाच सामना खेळत असणाऱ्या आकाशदीपसाठी सिराज आधार देताना दिसला.
Indian pacer, #MohammedSiraj, gives solid advice to #AkashDeep on Day 2 at Edgbaston!#ENGvIND 2nd Test, Day 3 | FRI, 4th JULY, 2:30 PM | Streaming on JioHotstar! pic.twitter.com/KXqekJ4cjB
— Star Sports (@StarSportsIndia) July 3, 2025
भारतानं एसबेस्टन कसोटीमध्ये दुसऱ्या दिवशीसुद्धा फलंदाजी करताना 310 धावांमध्ये 277 धावा जोडल्या. यामध्ये कर्णधार शुभमन गिलची 269 धावांची द्विशतकी खेळी क्रिकेटप्रेमींचं मन जिंकून गेली. तर, जडेजानं 89 धावांचं योगदान दिलं. इंग्लंडच्या बाजूनं शोएब बशीरनं इंग्लंडसाठी सर्वाधिक 3 गडी बाद केले. आकाशदीपनं भारताकडून गोलंदाजी करताना सलग दोन चेंडूंवर बेन डकेट आणि ओली पोप यांना बाद केलं. तर, सिराजनं जॅक क्रॉलीला बाद केलं. 25 धावांवर तीन गडी बाद झाल्यानं इंग्लंडला चांगलाच धक्का बसला मात्र जो रुट आणि हॅरी ब्रूकनं बिनबाद 52 धावांची भागिदारी करत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळालं.