Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

डोळे दाखवले, खांदे आपटले... विकेट घेतल्यानंतर सिराजने केलं आक्रमकपणे सेलिब्रेशन, Video Viral

India vs England 4th Day: भारत-इंग्लंड लॉर्ड्स कसोटीच्या तिसऱ्या दिवशी झालेल्या गोंधळानंतर, चौथ्या दिवसाची सुरुवातही तशीच काहीशी झाली आहे. संध्याकाळी शुभमन गिल आणि बेन डकेट यांच्यात जोरदार वाद झाला. सकाळी मोहम्मद सिराजने एक वाद निर्माण केला.  

डोळे दाखवले, खांदे आपटले... विकेट घेतल्यानंतर सिराजने केलं आक्रमकपणे सेलिब्रेशन, Video Viral

India vs England 4th Day: भारत विरुद्ध इंग्लंडच्या लॉर्ड्स टेस्टमध्ये चवथ्या दिवशी पुन्हा एकदा धक्कादायक प्रसंग घडला. मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या बेन डकेटचा विकेट घेताच मैदानावर तापलेलं वातावरण आणखीच गरम झालं. विकेट साजरी करताना सिराज चक्क डकेटजवळ गेला आणि दोघांचे खांदे जोरात आपटले. यानंतर अंपायरने सिराजला बोलावून समज दिली आणि वॉर्निंगही दिली.

तिसऱ्या दिवशीही झाला होता बवाल

याआधी तिसऱ्या दिवशी सामना संपण्याच्या शेवटच्या 5 मिनिटांमध्येही मैदानावर वाद झाला होता. शुभमन गिलने इंग्लंडच्या ओपनर्सवर राग काढला. डकेट आणि झॅक क्रॉली यांच्याशी गिलची जोरदार भांडण झाली होती. गिलने उंगली दाखवत त्यांना सुनावलं होतं. त्यानंतर चवथ्या दिवशी सकाळी सिराजने पुन्हा या वादाला तोंड फोडलं.

सिराजने इंग्लंडला दिले मोठे झटके

चवथ्या दिवशी सकाळपासून भारताने इंग्लंडवर जबरदस्त दबाव टाकला. मोहम्मद सिराजने बेन डकेटचा झटपट विकेट घेतला. डकेटचं कॅच जसप्रीत बुमराहने लपकलं आणि त्यानंतर सिराजने मैदानातच जोरदार साजरा केला. याच दरम्यान डकेटच्या अगदी जवळ जाऊन सिराजने सेलिब्रेशन केलं आणि त्यांचा खांदा डकेटला आपटला. त्यामुळे थोडक्यात दोघांमध्ये धक्काबुक्की होणार की काय अशी स्थिती निर्माण झाली होती.

अंपायरने दिली वॉर्निंग

ही घटना घडताच अंपायरने सिराजला थांबवलं आणि शांततेचा सल्ला दिला. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. सिराजची ही आक्रमकता चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

 

भारताची आघाडी मजबूत

सिराजने डकेटनंतर ओली पोपलाही माघारी धाडलं. इंग्लंडची अवस्था 50 रन्सच्या आतच बिकट झाली. जसप्रीत बुमराहही तुफान मारा करत आहे. नितीश रेड्डीनेदेखील एक विकेट घेतली. आता जो रूट आणि हॅरी ब्रूकवर साऱ्या इंग्लंडची जबाबदारी आहे. 

Read More