Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वैभव सुर्यवंशीला विसराल इतका स्फोटक, वय अवघं 20 वर्षे पण ठोकली शतकाची हॅटट्रिक!

Musheer Naushad Khan:  वैभव सुर्यवंशीच्या चमकदार कामगिरीत मुंबईचा उदयोन्मुख आणि खळबळ उडवून देणारा शतकवीर झाकोळला गेला.

वैभव सुर्यवंशीला विसराल इतका स्फोटक, वय अवघं 20 वर्षे पण ठोकली शतकाची हॅटट्रिक!

Musheer Naushad Khan: टीम इंडियाच्या विजयाची चर्चा इंग्लंडसोबत भारतातील तरुणांमध्येही आहे. एकीकडे टीम इंडियाच्या अंडर 19 टीमने इंग्लंडच्या अंडर 19 टीमचा पराभव केला. ज्यामध्ये सर्वाधिक चर्चा वैभव सूर्यवंशीच्या विक्रमी खेळीबद्दल पाहायला मिळाली. पण या चमकदार कामगिरीत मुंबईचा उदयोन्मुख आणि खळबळ उडवून देणारा शतकवीर झाकोळला गेला. या फलंदाजाने एकामागून एक तीन शतकी खेळी खेळल्या आहेत.

मोठा भाऊ बाहेर पण..

आपण तरुण मुशीर खानबद्दल बोलत आहोत, ज्याने शतकांची हॅटट्रिक केलीय. मुशीर खान हा इंग्लंड दौऱ्यावर गेलेल्या मुंबईच्या उदयोन्मुख संघाचा भाग आहे. मुशीर खान हा टीम इंडियाचा युवा स्टार सरफराजचा धाकटा भाऊ आहे. सरफराज खानला इंग्लंड दौऱ्यातून वगळण्यात आले. दुसरीकडे कार अपघातात मानेच्या दुखापतीनंतर मुशीर खानने शानदार पुनरागमन करून खळबळ उडवून दिली आहे. मुशीर खान मुंबई इमर्जिंग टीमसोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे. पहिल्या दोन सामन्यात शतक झळकावणाऱ्या मुशीरने तिसऱ्या सामन्यात शतक झळकावून शतकांची हॅटट्रिक पूर्ण केली. त्याच्या फलंदाजीसमोर इंग्लंडचे गोलंदाज असहाय्य दिसत होते. याशिवाय तो शानदार गोलंदाजीही करत आहे. गेल्या वर्षी कार अपघातात मानेला गंभीर दुखापत झाल्यानंतर रेड बॉल क्रिकेटमध्ये परतलेला मुशीर आता आपल्या अष्टपैलू कामगिरीने इंग्लंडमध्ये खळबळ उडवत आहे.

शतकांची हॅटट्रिक

मुशीर खानने शतकांची हॅटट्रिक केली आहे. त्याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये शानदार शतके झळकावली. त्यानंतर तिसऱ्या सामन्यातही त्याने फलंदाजीची ताकद दाखवली आहे. त्याने लॉफबरो यूसीसीई संघाविरुद्ध 116 चेंडूत 14 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 102 धावांची खेळी खेळली.

वैभवनेही केला कहर

दुसरीकडे 14 वर्षीय वैभव सूर्यवंशी त्याच्या फलंदाजीने कहर करताना दिसला. वैभवने पहिल्यांदा 31 चेंडूत 86 धावांची खेळी खेळली. त्यानंतर त्याने 146 धावांची विक्रमी खेळी खेळली. भारताच्या इंग्लंड दौऱ्यादरम्यान हे तरुण खेळाडू चर्चेत दिसले. चौथ्या युवा एकदिवसीय सामन्यात वैभवला फक्त 33 धावा करता आल्या.

सलग तिसऱ्या सामन्यात शतक

इंग्लंड दौऱ्यातील तिसऱ्या सामन्यात मुशीरने लॉफबरो यूसीसीईविरुद्ध फक्त 116 चेंडूत 102 धावांची खेळी केली. ज्यामध्ये 14 चौकार आणि 1 षटकार मारला. मुशीरने या सामन्यात स्फोटक फलंदाजी करून गोलंदाजांना आश्चर्यचकित केले आणि त्रास दिला. मुशीरने त्याच सामन्यात शतक आणि 10 बळी घेऊन खळबळ उडवून दिली. त्याच वेळी 3 जुलै रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात मुशीरने शतक आणि गोलंदाजीसह 10 बळी घेऊन चमत्कार केला. इंग्लंड दौऱ्यावरील त्याच्या दुसऱ्या सामन्यात मुशीरने 127 चेंडूत 125 धावा केल्या आणि गोलंदाजी करताना पहिल्या डावात 6 बळी आणि दुसऱ्या डावात 4 बळी घेण्यात यशस्वी झाला आणि एकाच सामन्यात शतक आणि 10 बळी घेण्याचा धमाका केला.

पहिल्या सामन्यातही झळकावले होते शतक

पहिल्या सामन्यात मुशीरने नॉटिंगहॅमशायर सेकंड इलेव्हनविरुद्ध 127 चेंडूत 123 धावांची खेळी केली ज्यामध्ये त्याने 14 चौकार मारले. हा सामना अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना मुंबई संघाने 448 धावा केल्या त्यानंतर नॉटिंगहॅमशायरचा पहिला डाव 201 धावांवर संपला. फॉलो-ऑननंतर इंग्लिश संघाने दुसऱ्या डावात 250 धावांत 7 विकेट गमावल्या आणि अखेर हा सामना अनिर्णित राहिला.

Read More