Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs ENG : मैदानावर पुन्हा भिडले सॅम कुरन आणि हार्दिक पांड्या

सॅम कुरन आणि भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात पुन्हा वाद 

Ind vs ENG : मैदानावर पुन्हा भिडले सॅम कुरन आणि हार्दिक पांड्या

मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेचा दुसरा वनडे सामना आज पुण्यात खेळला गेला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 6 विकेट गमावत 336 धावा केल्या. भारताच्या डावादरम्यान इंग्लंडचा गोलंदाज सॅम कुरन आणि भारताचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या यांच्यात पुन्हा वाद पाहायला मिळाला. ज्यामुळे अपायरला मध्यस्थी करावी लागली.

भारताच्या फलंदाजीच्या 46 व्या ओव्हरदरम्यान सॅम कुरनच्या एकाच ओव्हरमध्ये 3 षटकार ठोकले होते. या तीनपैकी दोन षटकार हार्दिक पांड्याने ठोकले होते. शेवटच्या बॉलवर हार्दिकने पुन्हा जोरदार शॉट मारण्याचा प्रयत्न केला. पण हार्दिकने तो चेंडू चुकविला. बॉल रिकामा गेला. कुरनने हार्दिकला काहीतरी म्हटले, त्यानंतर हार्दिकनेही त्याला उत्तर दिले. दरम्यान, पंचला मध्यभागी येऊन बचाव करावा लागला.

पहिल्या वनडे सामन्यातही भारताच्या डावाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये टॉम कुरनने कृणाल पांड्याला काहीतरी म्हटले होते. त्यानंतर क्रुणाल देखील टॉमवर चिडला होता. या दोघांमधील वाढता वादविवाद पाहता, मैदानावरील पंचांना या दोन्ही खेळाडूंमध्ये मध्यस्थी करावी लागली होती.

Read More