Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

कोहलीचा स्वॅग! 147 Kmph बेफाम चेंडूवर ठोकला षटकार, व्हिडीओ व्हायरल

या सामन्यातील एक मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

कोहलीचा स्वॅग! 147 Kmph बेफाम चेंडूवर ठोकला षटकार, व्हिडीओ व्हायरल

अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड टी 20 सीरिजमधील शेवटचा सामना शनिवार झाला. या मालिकेत 3-2 ने भारतीय संघानं विजय मिळवला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात निर्णयाक सामना जिंकल्यानं भारतीय संघाचं कौतुक होत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहलीने खेळाची सुरुवात शानदार केली. त्यामुळे इंग्लंडसमोर धावांचा डोंगर रचण्यात भारतीय संघाला यश मिळालं. या सामन्यातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

विराट कोहलीचा स्वॅग

रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या सलामी जोडीमुळे टीम इंडियाची सुरुवात तुफान आल्यासारखी झाली. दोघांनी मिळून 94 धावा केल्या. रोहित शर्मा वेगवान फलंदाजी करत होता. सहाव्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडनं टाकलेल्या 147 Kmph तुफान बॉलला टोलवलं आणि सर्वजण आश्चर्यानं पाहात राहिले. 

विराट कोहलीनं या बॉलला असं काही टोलवलं की षटकार गेला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं मजेदार हावभाव केले. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

कोहलीने मजेदार भरलेल्या रोहित शर्माला चिडवण्याचा प्रयत्न केला. या व्हिडीओमध्ये कोहली रोहितला सांगण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. अशा बॉलवर रोहितही षटकार ठोकू शकतो असं तो त्याला मजेशीर पद्धतीनं सांगताना दिसत आहे. कोहलीच्या हावभावाचा मजेशीर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read More