Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

गिल आणि गंभीरमध्ये ऑल इज नॉट वेल? टीम इंडियात टोकाचं राजकारण, भारतीय संघात नेमकं काय घडतंय?

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात ५ सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु आहे. चौथ्या सामन्याकरता टीम इंडियात काही बदल करण्यात आले आहेत, ज्यामुळे सिलेक्शनबाबत टीम मॅनेजमेंटमध्ये गोंधळल असल्याची माहिती मिळतेय.    

गिल आणि गंभीरमध्ये ऑल इज नॉट वेल? टीम इंडियात टोकाचं राजकारण, भारतीय संघात नेमकं काय घडतंय?

IND VS ENG Test : भारतीय क्रिकेट संघाची सिलेक्शन पॉलिसी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात आली आहे. संघातील खेळाडूंना कपड्यांप्रमाणे बदललं जातंय. त्यामुळे या घटनाक्रमानुसार टीम इंडियाचा (Team India) हेड कोच आणि कर्णधार यांच्यात मतभेद असल्याचं समोर येतंय. सुरुवातीला वेगवान गोलंदाज हर्षित राणा (Harshit Rana) याला इंग्लंड विरुद्ध टेस्ट सीरिजमध्ये कव्हर गोलंदाज म्हणून सामील करण्यात आलं होतं. परंतू आता अचानकपणे कमी अनुभव असणाऱ्या अंशुल कंबोजला (Anshul Kamboj) संघात सामील करण्यात आलं आहे. ज्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की, टीम मॅनेजमेंट सिलेक्शनबाबत एवढं गोंधळलेलं का आहे? 

कंबोजची निवड क्रिकेटिंग लॉजिकच्या विरुद्ध : 

वेगवान गोलंदाज हर्षित राणा याने आयपीएल आणि India A अशा दोन्ही स्तरावर आपल्या गोलंदाजीचं टॅलेंट दाखवलं आहे. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. पण त्याला अचानक ड्रॉप करून अंशुल कंबोजला इंग्लंडला बोलावणे हे निवड समितीच्या क्रिकेटिंग लॉजिकवर अनेक प्रश्न उपस्थित करते. गोलंदाज अंशुल कंबोजच्या अचानक करण्यात आलेल्या निवडीमुळे टीम इंडियात सर्व काही आलबेल नाही हे समोर येतंय. 

गौतम गंभीर आणि शुभमन गिलमध्ये सर्व काही ठीक नाही? 

भारताचे नवे हेड कोच गौतम गंभीर हा अतिशय कठोर आणि विजयला प्राथमिकरता देणारे रणनीतिकार आहे. दुसरीकडे शुभमन गिल टेस्ट क्रिकेटसाठी अतिशय नवा कर्णधार आहे. कदाचित आपली जागा निश्चित करण्यासाठी तो प्लेयर-फ्रेंडली अप्रोच स्वीकारत असेल. जर गिल हा निवड समितीच्या काही निर्णयांमध्ये हस्तक्षेप करत असेल तर यामुळे कोच आणि कर्णधार यांच्यातील पॉवर बॅलेन्सला प्रभावित करू शकतो. हर्षित राणाला गौतम गंभीरचा आवडता खेळाडू मानले जाते. गंभीर ज्याप्रकारे राणावर विश्वास व्यक्त करतो, त्यानुसार त्याचा निर्णय असता तर त्यानं राणाला टीम इंडियात सामील केलं असतं.  

हेही वाचा : 'कोणीतरी पृथ्वी शॉला दाखवा आणि सांगा...', इंग्लंडच्या दिग्गजाकडून सरफराज खानचं कौतुक, 'तुम्ही तुमचा वेळ...'

 

टीम इंडियाचा पुढील सामना कधी? 

भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा मँचेस्टरमध्ये खेळवला जाणार आहे. आधीच्या तीन सामन्यापैकी पहिला आणि तिसरा सामना हा इंग्लंडने जिंकला. तर भारताला दुसरा सामना जिंकण्यात यश आले होते. इंग्लंडने यासह सीरिजमध्ये १-२ ने आघाडी घेतली आहे. जर पिछाडीवर असणाऱ्या टीम इंडियाला इंग्लंडची बरोबरी साधायची असेल तर त्यांना चौथा टेस्ट सामना जिंकावा लागेल.  

Read More