IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील चौथा सामना हा मँचेस्टर येथे खेळवला जाणार आहे. 23 जुलै पासून या सामन्याला सुरुवात होईल. मात्र मँचेस्टरमध्ये सराव सत्रादरम्यान भारतीय पेसर अर्शदीप सिंहच्या (Arshdeep Singh) डाव्या हाताला दुखापत झाली, विशेष म्हणजे ही दुखापत त्यांच्या बॉलिंग आर्मवर झाली, ज्यामुळे टीम इंडियाचं (Team India) टेन्शन वाढलं. आता अर्शदीप सिंह हा दुखापतीतून बरा होण्याच्या प्रयत्नात असताना वेगवान गोलंदाज अंशुल कंबोजला (Ansul Kamboj) कव्हर म्हणून संघात सामील करण्यात आलं आहे.
मँचेस्टर टेस्टपूर्वी नेटमध्ये सराव करत असताना साई सुदर्शनचा शॉट पकडताना अर्शदीपच्या डाव्या हाताला दुखापत झाली. सहाय्यक कोच रियान टेनने सांगितलं की, मँचेस्टर टेस्ट जवळ येत असताना आम्ही संघ संयोजनाचा निर्णय घेऊ, विशेषतः अर्शदीपची प्रकृती लक्षात घेता. त्याला एक कट आला, पण तो किती खोलवर आहे हे पाहणे बाकी आहे. वैद्यकीय पथकाने त्याला डॉक्टरकडे नेले आहे आणि त्याला टाके लागतील की नाही हे सुद्धा अजून पहावं लागेल.
ग्रोइनच्या दुखापतीने त्रस्त असलेल्या आकाशदीपने आतापर्यंत दुसरा आणि तिसऱ्या टेस्ट सामना खेळला आहे. पण अर्शदीप सिंहने आतापर्यंत सीरिजमधील एकही सामना खेळला नाही. आकाशदीप चौथ्या टेस्ट सामन्यात खेळणार की नाही याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. तर अर्शदीपचं मँचेस्टर टेस्टमध्ये खेळणं जरा अवघडच वाटतंय. ज्यामुळे सिलेक्टरनी अंशुल कंबोजला बोलावलं आहे.
हेही वाचा : हार्दिक पंड्याचा पुन्हा ब्रेकअप! काही महिन्यांतच तुटलं नवीन नातं, दुसऱ्यांदा प्रेमभंग
KAMBOJ TIME IN INDIAN TEAM.
Mufaddal Vohra (mufaddalvohra) July 20, 2025
Anshul Kamboj has been added to India's Test squad for the ongoing England Tests. (Express Sports). pic.twitter.com/ldwA3PeyoB
अंशुल कंबोजने मागच्यावर्षी केरळ विरुद्ध लाहलीमध्ये रणजी ट्रॉफी सामना खेळताना हरियाणासाठी एका इनिंगमध्ये 10 विकेट घेतल्या होत्या, तो बंगालच्या प्रेमांग्शु चटर्जी आणि राजस्थानच्या प्रदीप सोमासुंदरमनंतर असा कारनामा करणारा तिसरा गोलंदाज ठरला होता. गेल्या हंगामात त्याने सहा रणजी सामन्यांमध्ये 34 विकेट्स घेतल्या.