Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

गौतम गंभीरने ऋषभ पंतच्या सेलिब्रेशनवर आणली बंदी? नेमकं कारण काय?

IND VS ENG Test : लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने शतक ठोकल्यावर मैदानात ओलांटी उडी मारून सेलिब्रेशन केलं होतं. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं तसं सेलिब्रेशन केलं नाही. याला हेड कोच गौतम गंभीर कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. 

गौतम गंभीरने ऋषभ पंतच्या सेलिब्रेशनवर आणली बंदी? नेमकं कारण काय?

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील पहिल्या सामन्यात भारताचा इंग्लंड विरुद्ध पराभव झाला असला तरी स्टार फलंदाज असलेल्या ऋषभ पंतने फलंदाजीत दोन्ही इनिंगमध्ये शतकीय कामगिरी केली. या कामगिरीनंतर भारताकडून टेस्ट सामन्यातील दोन्ही इनिंगमध्ये शतक ठोकणारा ऋषभ पंत हा भारताचा पहिला विकेटकिपर फलंदाज ठरला. लीड्स टेस्टच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने (Rishabh Pant) शतक ठोकल्यावर मैदानात गोलांटी उडी मारून सेलिब्रेशन केलं होतं. मात्र दुसऱ्या इनिंगमध्ये त्यानं तसं सेलिब्रेशन केलं नाही. याला हेड कोच गौतम गंभीर (Gautam Gambhir) कारणीभूत असल्याचं म्हटलं जात आहे. 

ऋषभ पंतने टीकाकारांना दिलं चोख उत्तर :  

डिसेंबर 2024 मध्ये झालेली बॉर्डर गावस्कर सीरिज ऋषभ पंतसाठी चांगली ठरली नाही. यात तो फलंदाजीत भारतासाठी मोठं योगदान देऊ शकला नाही. मेलबर्नमध्ये झालेल्या चौथा टेस्ट सामन्यात बोलँडने टाकलेल्या बॉलवर स्कूप शॉट खेळताना पंतने कॅच आउट झाला आणि नॅथन लिऑनने त्याची कॅच पकडली. महत्वाच्यावेळी खराब शॉट खेळून स्वस्तात विकेट गमावल्याने कॉमेंट्री बॉक्समध्ये असलेले सुनील गावसकर पंतवर संतापले. यानंतर त्यांनी ऋषभ पंतला तीनवेळा Stupid, Stupid, Stupid म्हणजेच मूर्ख असं म्हंटलं. गावसकरांचा हा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता, ज्यावरून ऋषभची ट्रोलिंग सुद्धा झाली.

परंतू लीड्स टेस्टमधील सामन्याच्या पहिल्या इनिंगमध्ये ऋषभ पंतने शतक ठोकल्यावर कॉमेंट्री बॉक्समधून 'Superb, Superb, Superb' म्हणजेच उत्कृष्ट असं म्हणत सुनील गावसकरांनी पंतचं कौतुक केलं होतं. जेव्हा दुसऱ्या इनिंगमध्ये पुन्हा एकदा ऋषभ पंतने शतक ठोकलं तेव्हा कॉमेंट्री बॉक्समधून ऋषभच्या शतकाचं कौतुक करण्यासाठी गावसकर गॅलरीत आले. त्यांनी ऋषभला इशारा करून त्याचं सिग्नेचर गोलांटी उडी सेलिब्रेशन करण्यास सांगितलं. पण पंतने त्यांना नकार दिला आणि पुढच्यावेळी तसं सेलिब्रेशन करेन असं सांगितलं. मात्र पंतने मैदानात त्याच सिग्नेचर सेलिब्रेशन का केलं नाही याचं कारण आता समोर आलं आहे. 

पहिल्या इनिंगमध्ये पंतचं शतक सेलिब्रेशन : 

 

दुसऱ्या इनिंगमध्ये पंतचं शतक : 

 

गौतम गंभीर ठरला कारण : 

सूत्रांच्या माहितीनुसार CricBlogger ने सांगितलं की भारतीय संघाचा हेड कोच गौतम गंभीरने ऋषभ पंतला असं सेलिब्रेशन करण्यास मनाई केली होती. शतक लगावल्यावर ऋषभ ज्या प्रकारे समरसॉल्ट (गोलांटी) करतो त्यामुळे त्याला दुखापत होऊ शकते. गौतम गंभीरने याच भीतीपोटी पंतला अशा प्रकारे सेलिब्रेशन करू नकोस असं सांगितलं, ज्यामुळे त्याला नाहक दुखापत होणार नाही.  

 

भारत विरुद्ध इंग्लंड टेस्ट सीरिज वेळापत्रक : 

भारत विरुद्ध इंग्लंड पहिला सामना : 20 ते 24 जून 
भारत विरुद्ध इंग्लंड दुसरा सामना  : 2 ते 6 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड तिसरा सामना  : 10 ते 14 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड चौथा सामना  :  23 ते 27 जुलै 
भारत विरुद्ध इंग्लंड पाचवा सामना : 31 जुलै ते 4 ऑगस्ट 

Read More