IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात खेळवण्यात आलेली 5 सामन्यांची टेस्ट सीरिज 2-2 अशा बरोबरीत सुटली. यात मॅन ऑफ द सीरिज पुरस्कारासाठी शुभमन गिल (Shubman Gill) आणि हॅरी ब्रुकला (Harry Brook) निवडण्यात आलं. तेव्हा पासून हॅरी ब्रूकबाबत वाद निर्णय झाला आहे. लोक ब्रूक ऐवजी जो रूट (Joe Root) हा या पुरस्काराचा खरा मानकरी होता असं म्हणत आहेत. असं असताना आता या संपूर्ण वादाने नवं वळण घेतलं आहे.
इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूकने भारतीय संघाचा कोच गौतम गंभीरच्या सीरिजमधील सर्वोत्कृष्ट खेळाडू निवडण्याच्या निर्णयावर असहमति दर्शवली आहे. त्याचं म्हणणं आहे की या सीरिजसाठी सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार हा सर्वोत्कृष्ट परफॉर्मन्स केलेल्या जो रूटला मिळायला हवा होता. ब्रुकने बीबीसीला म्हटले की, 'मी रूट एवढ्या धावा केल्या नाहीत, त्यामुळे मला वाटतं की त्याला मॅन ऑफ द सीरिजचा पुरस्कार मिळायला हवा होता. त्याला समरमध्ये पुन्हा इंग्लंडचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पुरस्कार मिळायला हवा होता. ही सीरिज खूपच जबरदस्त राहिली. प्रामाणिकपणे सांगायचं तर मी आधी विचार केला नव्हता की ही सीरिज बरोबरीत सुटेल.
भारत - इंग्लंड सीरिजमध्ये इंग्लंडच्या हॅरी ब्रूकने 53.44 च्या सरासरीने 481 धावा केल्या. तर जो रूटने 67.12 च्या सरासरीने 537 धावा केल्या. दोन्ही संघाच्या कोचने विरुद्ध संघाच्या खेळाडूंमधून प्लेअर ऑफ द सीरिज खेळाडू निवडला. यात इंग्लंड संघाच्या कोचने शुभमन गिलची निवड केली तर टीम इंडियाचा हेड कोच गौतम गंभीरने हॅरी ब्रूकला निवडलं.
भारताने या सीरिजमधील पहिला टेस्ट सामना गमावून दुसऱ्या टेस्टमध्ये बरोबरी केली, पण लॉर्ड्समध्ये खेळण्यात आलेल्या तिसरा सामना ते खूपच कमी अंतराने हरले. त्यानंतर चौथा टेस्ट सामना ड्रॉ झाला. सीरिजमध्ये 1-2 ने मागे असलेल्या भारताने शेवटच्या टेस्ट सामन्यात कमबॅक केलं आणि त्यांनी 6 धावांनी सामना जिंकून टेस्ट सीरिज बरोबरीत आणली.
1. मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार कोणाला मिळाला?
मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार भारताच्या शुभमन गिल आणि इंग्लंडच्या हॅरी ब्रूक यांना मिळाला. इंग्लंडच्या कोचने गिलची, तर भारताच्या कोच गौतम गंभीरने ब्रूकची निवड केली.
2. हॅरी ब्रूकबाबत कोणता वाद निर्माण झाला आहे?
हॅरी ब्रूक ऐवजी जो रूटला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार मिळायला हवा होता, असा दावा काही लोकांनी केला. याला ब्रूकनेही पाठिंबा दिला आहे.
3. हॅरी ब्रूकने मॅन ऑफ द सीरिज पुरस्काराबाबत काय मत व्यक्त केलं?
हॅरी ब्रूकने बीबीसीला सांगितलं की, त्याने जो रूटइतक्या धावा केल्या नाहीत आणि रूटच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्याला मॅन ऑफ द सीरिज पुरस्कार मिळायला हवा होता