Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND VS ENG Test : ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे 'या' खेळाडूचं नशीब फळफळलं, टीम इंडियात मिळणार संधी?

Rishabh Pant Injured :  भारत विरुद्ध इंग्लंड टेस्टमधील चौथा टेस्ट सामना हा मँचेस्टरमध्ये 23 जुलै ते 26 जुलै दरम्यान खेळवला जात आहे. पहिल्या दिवशी भारताचा स्टार फलंदाज ऋषभ पंतला दुखापत झाली आणि त्याला मैदानाबाहेर जावं लागलं होतं. पाचव्या सामन्यात त्याची जागा कोण घेणार याविषयीची माहिती समोर आली आहे.   

IND VS ENG Test :  ऋषभ पंतच्या दुखापतीमुळे 'या' खेळाडूचं नशीब फळफळलं, टीम इंडियात मिळणार संधी?

IND VS ENG Test  : मँचेस्टरच्या मैदानात भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात सुरु झालेल्या सीरिजमधील चौथा सामना बुधवार पासून सुरु झाला. मात्र पहिल्याच दिवशी टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज ऋषभ पंतला (Rishabh Pant) फलंदाजी करत असताना पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे तो रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर पडला. सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभच्या पायाला फ्रॅक्चर झालं असून तो जवळपास 6 आठवडे क्रिकेटपासून दूर राहण्याची शक्यता आहे. पंतच्या दुखापतीमुळे एका स्टार युवा खेळाडूचं नशीब फळफळणार असल्याची माहिती मिळतेय. तब्बल 2 वर्षांनी एक स्टार क्रिकेटरला टेस्ट टीम इंडियात खेळण्याची संधी मिळू शकते. 

ऋषभ पंतला नेमकं काय झालंय?

टेस्ट सामन्याच्या पहिल्या दिवशी ऋषभ पंतच्या उजव्या पायावर बॉल लागल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पंतच्या उजव्या पायाच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झालं असून तो ही सीरिज पुढे खेळू शकणार नाही. सूत्रांच्या माहितीनुसार ऋषभला डॉक्टरांनी जवळपास दीड महिना आरामाचा सल्ला दिला आहे. मात्र याबाबत अद्याप बीसीसीआयने अधिकृत माहिती दिलेली नाही. जवळपास 6 आठवडे पंतला क्रिकेटपासून दूर रहावे लागेल. यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय, कारण पंत हा इंग्लंड सीरिजमध्ये चांगल्या फॉर्मात होता त्याने पहिल्या सामन्यात दोन शतक सुद्धा ठोकली होती. तेव्हा ऋषभ पंतच्या जागी कोणाला संधी दिली जाते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 

पंतच्या जागी कोणाला संधी?

ऋषभ पंत हा भारताचा टेस्ट संघाचा उपकर्णधार असून तो विकेटकिपर आणि फलंदाज म्हणून उत्कृष्ट कामगिरी करतो. तेव्हा द इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, 'निवड समिती पाचव्या टेस्टपूर्वी ईशान किशनचा संघात समावेश करू शकते. कारण पंत दुखापतीमुळे 31 जुलै ते 4 ऑगस्ट दरम्यान ओव्हल येथे खेळल्या जाणाऱ्या शेवटच्या टेस्ट सामन्याचा भाग असणार नाही'. 

हेही वाचा : जगातील 5 सर्वात वजनदार क्रिकेटर, पहिल्या नंबरच्या खेळाडूचं वजन ऐकून थक्क व्हाल

 

ईशान किशन 2 वर्षांपासून टीम इंडियाच्या बाहेर : 

विकेटकिपर आणि फलंदाज ईशान किशन याने त्याचा शेवटचा सामना टीम इंडियाकडून टी 20 फॉरमॅटमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध नोव्हेंबर 2023 रोजी खेळला होता.  तर ईशानने आतापर्यंत केवळ 2 टेस्ट सामने खेळले असून त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये शेवटचा सामना हा जुलै 2023 मध्ये वेस्ट इंडीज विरुद्ध खेळला होता. 2024-25 साठी त्याचा बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश करण्यात आला नव्हता. दरम्यान ईशानने देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगलं परफॉर्म केलं. त्यानंतर २०२५ साथीच्या बीसीसीआय सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये त्याचा पुन्हा समावेश करण्यात आला. ईशान किशन हा सध्या इंग्लंडमध्ये असून तो काऊंटी क्रिकेट खेळतोय. जर पंत ऐवजी त्याला संधी मिळाली तर तो २ वर्षांनी भारताकडून टेस्ट सामना खेळेल. 

Read More