IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यातील आतापर्यंत झालेल्या तीन सामन्यांपैकी एक सामना भारताने तर दोन सामने हे इंग्लंडने जिंकलेत. ज्यामुळे इंग्लंड सध्या सीरिजमध्ये 1-2 ने आघाडीवर आहे. आता टीम इंडियाला सीरिजमध्ये इंग्लंडशी बरोबरी साधायची असेल तर त्यांना 23 जुलै पासून होणारा चौथा सामना जिंकावा लागेल. मात्र वर्क लोड मॅनेजमेंटमुळे या सामन्यात टीम इंडियाचा अनुभवी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) खेळणार की नाही याबाबत प्रश्न चिन्ह होते. मात्र आता सामन्याला एक दिवस शिल्लक असताना टीम इंडियाकडून (Team India)बुमराहच्या उप्लब्धतेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
मँचेस्टर टेस्टपूर्वी टीम इंडियातील अनेक खेळाडू दुखापतींनी संघर्ष करत आहेत. ऋषभ पंत, नितीश कुमार रेड्डी, आकाशदीप, अर्शदीप हे खेळाडू दुखापतग्रस्त आहेत. दोन गोलंदाज दुखापतग्रस्त असल्याने अंशुल कंबोजला कव्हर गोलंदाज म्हणून बोलवण्यात आलं आहे.
हेड कोच गौतम गंभीरने पूर्वीच स्पष्ट केलं होतं की, वर्क लोड मॅनजेमेंटमुळे बुमराह 5 सामन्यांच्या सीरिजमधील फक्त ३ सामने खेळेल. यापैकी लीड्स आणि लॉर्ड्स टेस्ट सामन्यात बुमराहचा प्लेईंग ११ मध्ये सहभाग करण्यात आला होता. आता सीरिजमधील दोन सामने शिल्लक असल्याने तो दोन्ही पैकी कोणता सामना खेळणार याबाबत शंका होती. मात्र टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं की, 'जस्सी भाई चौथ्या सामन्यात खेळणार, जेवढं मला माहित आहे'. सिराज पुढे म्हणाला की, 'आकाशदीप कंबरेच्या समस्येने त्रस्त आहे, पण त्याने आज गोलंदाजी केली परंतु आता फिलिजो पाहतील. त्यामुळे संघात काही बदल आहेत पण आपल्याला चांगल्या क्षेत्रात गोलंदाजी करावी लागेल. योजना सोपी आहे, फक्त चांगल्या क्षेत्रात गोलंदाजी करावी'.