Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs ENG: लीड्स कसोटीत पंतने केली मोठी चूक, रागाच्या भरात केली 'ही' कृती; ICC करणार कारवाई?

IND vs ENG 1st Test: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना लीड्समध्ये रोमांचक वळणावर पोहोचला आहे. दरम्यान  ऋषभ पंतची एक कृती चर्चेत आली आहे.   

IND vs ENG: लीड्स कसोटीत पंतने केली मोठी चूक, रागाच्या भरात केली 'ही' कृती; ICC करणार कारवाई?

Rishabh Pant Umpire Fight: भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना लीड्सच्या मैदानावर अत्यंत रोचक वळणावर पोहोचला आहे. भारताने पहिल्या डावात 471 धावा केल्या, त्याला उत्तर देताना इंग्लंडने 465 धावा केल्या. त्यामुळे भारताला 6 धावांची आघाडी मिळाली. तिसऱ्या दिवसाअखेरीस भारताने दुसऱ्या डावात 2 बाद 90 अशी मजल मारली असून आघाडी आता 96 धावांची झाली आहे. आता भारताचं लक्ष्य ही आघाडी किमान 300 वर नेण्याचं असणार आहे. पण या साऱ्या घडामोडींमध्ये एका घटनेने क्रिकेटविश्वात एकच खळबळ उडवली आहे. ऋषभ पंतच्या एका कृतीमुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 

पंत अडचणीत? 

तिसऱ्या दिवसादरम्यान, भारतीय संघाचा उपकर्णधार आणि यष्टीरक्षक ऋषभ पंत अंपायर पॉल रीफेल यांच्याशी मैदानात वाद घालताना दिसला. हा वाद इतका वाढला की आता पंतवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचं (ICC) लक्ष त्याच्याकडे ओढलं गेलं आहे. ही घटना  इंग्लंडच्या डावातील 61व्या षटकात घडली. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रूकने एक चौकार मारला, त्यानंतर पंतने त्या चेंडूची स्थिती योग्य नाही असा दावा करत अंपायरकडे त्याची तपासणी करण्याची मागणी केली. अंपायर रीफेल यांनी बॉल गेजचा वापर करत चेंडू योग्य असल्याचं स्पष्ट केलं, पण हे पंतला अजिबात पटले नाही.

पंतने केली 'ही' कृती 

नाराज पंतने चेंडू रागाने मैदानात फेकून दिला आणि काही वेळासाठी खेळापासून बाजूला झाले. ही कृती मैदानावरील महत्त्व धोक्यात आणणारी मानली जात असून कमेंटेटर मार्क बुचरनेही यावर तिखट प्रतिक्रिया दिली.

 

ICCच्या आचारसंहितेचा भंग?

पंतच्या या वर्तनामुळे त्याच्यावर ICCच्या आचारसंहितेच्या दोन नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला जाऊ शकतो. अंपायरच्या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त करणे हे चुकीचे होते. पंतने चेंडू योग्य नसल्याचा हट्ट धरत रीफेल यांच्याशी वाद घातला. अनुच्छेद 2.9 नुसार, चेंडू किंवा इतर उपकरणे कोणाकडे उद्देशून किंवा धोकादायक पद्धतीने फेकणे हे योग्य नाही. पंतने चेंडू मैदानावर रागात फेकून दिला होता. या प्रकरणात ICCकडून दंड किंवा निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

पंतचा ऐतिहासिक विक्रम

वादग्रस्त प्रसंगांव्यतिरिक्त, पंतने यष्टीरक्षक म्हणून एक खास विक्रमही नोंदवला. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यांनी 150 झेल पूर्ण करत भारताचा तिसरा सर्वाधिक यशस्वी यष्टीरक्षक होण्याचा मान मिळवला. आता त्याच्या नावावर 151 झेल आणि 15 स्टंपिंगसह एकूण 166 विकेट्स जमा झाक्या आहेत. 

 

Read More