IND VS ENG Test : भारताचा टेस्ट कर्णधार शुभमन गिलने (Shubman Gill) एजबेस्टनमध्ये भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) सीरिजचा दुसरा सामना खेळत असताना यात तब्बल 269 धावांची कामगिरी केली. यासह तो टेस्ट क्रिकेटमध्ये भारताचा कर्णधार म्हणून सर्वाधिक 269 धावा करणारा पहिला कर्णधार ठरला. यासह त्याने 10 पेक्षा अधिक रेकॉर्डस् नावावर केले. त्यामुळे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सुद्धा यामुळे खूप प्रभावित झाला. त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट करून शुभमनचे कौतुक केले. यावर एका चाहत्याने त्याला सारा तेंडुलकरच्या (Sara Tendulkar) लग्नाविषयी प्रश्न विचारला.
मागील काही वर्षांपासून शुभमन गिल आणि सारा तेंडुलकर हे दोघे एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात सुद्धा आलंय. परंतु दोघांनी एकदाही त्यांच्या नात्याबाबत खुलासा केला नाही. काही दिवसांपासून गिल आणि साराचं ब्रेकअप झाल्याच्या बातम्या सुद्धा समोर येत होत्या.
सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर पोस्ट केली यात त्याने म्हटले की, 'शुभमन गिल आणि रवींद्र जडेजाने दाखवलेल्या इंटेंट आणि कमिटमेंटला पाहून खूप आनंद झाला. दोघे खूप चांगले खेळले'. या पोस्टवर एका चाहत्याने कमेंट करत लिहिले की, 'सारा तेंडुलकरच्या लग्नाची गोड बातमी आम्हाला कधी ऐकायला मिळेल. शुभमन तर पुढील इनिंगसाठी तयार आहे'.
हेही वाचा : यशस्वी जयस्वालने टेस्ट क्रिकेटमध्ये रचला इतिहास, सचिन अन् विराटला सोडलं मागे
मीडिया रिपोर्ट्सनुसार सारा तेंडुलकर ही सध्या भारतात नसून युरोप दौऱ्यावर गेली आहे. साराने इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले ज्यात स्विझर्लंडचं शहर दिसतंय.
Very pleased to see the intent and commitment shown by ShubmanGill and imjadeja today. Well played! pic.twitter.com/e1XK6NfFzG
— Sachin Tendulkar (sachin_rt) July 3, 2025
शुभमन गिलने दुसऱ्या इनिंगमध्ये 269 धावांची कामगिरी केली, यासह त्याने 10 पेक्षा जास्त रेकॉर्डस् मोडले. यापूर्वी SENA देश ( साउथ अफ्रीका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) मध्ये सर्वात मोठी इनिंग खेळण्याचा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या (241) नावावर होता. मात्र आता हा रेकॉर्ड शुभमन गिलच्या नावावर नोंदवला गेलाय.