Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'एकीकडे मोहम्मद तर दुसरीकडे कृष्णा...' कर्णधार शुभमन गिल हे काय बोलून गेला? Video Viral

IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल हा खेळाडूंचं मनोबल वाढवताना दिसला. मात्र यावेळी गिलने 'मोहम्मद आणि कृष्णा' विषयी केलेली टिप्पणी स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

'एकीकडे मोहम्मद तर दुसरीकडे कृष्णा...' कर्णधार शुभमन गिल हे काय बोलून गेला? Video Viral

IND VS ENG 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. शुक्रवार 20 जून पासून या सीरिजच्या पहिल्या सामन्याला सुरुवात झाली. 24 जून रोजी या सामन्याचा शेवटचा दिवस असून टीम इंडियाने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान दिले आहे.  भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात लीड्समधील हेडिंग्लेच्या मैदानात टीम इंडियाचा कर्णधार शुभमन गिल हा खेळाडूंचं मनोबल वाढवताना दिसला. मात्र यावेळी गिलने 'मोहम्मद आणि कृष्णा' विषयी केलेली टिप्पणी स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झाली, ज्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

भारताने इंग्लंडला विजयासाठी 371 धावांचे आव्हान दिल्यावर मैदानात गोलंदाजीची इनिंग सुरु केल्यावर शुभमन गिल हा भारतीय गोलंदाजांचा उत्साह वाढवताना दिसला. यावेळी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टनुसार शुभमन म्हणाला की, 'एकीकडे मोहम्मद आहे तर दुसरीकडे कृष्णा. दोघे धुमाकूळ घालतील'. दावा केला जातोय की शुभमन गिलचं हे स्टेटमेंट स्टंप माईकमध्ये रेकॉर्ड झालं. मात्र या व्हिडीओ आणि ऑडिओची पुष्टी झी २४ तास करत नाही. शुभमन गिल यांचे विधान सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पण त्याचा ऑफिशल व्हिडिओ सध्या उपलब्ध नाही.

मोहम्मद सिराज आणि  प्रसिद्ध कृष्णा : 

मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या इंग्लंड विरुद्ध या सामन्यातील परफॉर्मन्सवर नजर टाकली, तर सिराजने पहिल्या इनिंगमध्ये 2 विकेट घेतल्या, तर प्रसिद्ध कृष्णाने पहिल्या इनिंगमध्ये खूप धावा दिल्या पण 3 विकेट सुद्धा मिळवल्या. प्रसिद्ध कृष्णाने दुसऱ्या इनिंगमध्ये इंग्लंडच्या झॅक क्रॉली आणि ओली पोप या दोघांना बाद केले. 

पाहा व्हिडीओ : 

fallbacks

विजयासाठी इंग्लंडला 371 धावांचं आव्हान : 

भारताच्या दुसऱ्या इनिंगमध्ये फलंदाजी करताना आधी केएल राहुलने मग त्यापाठोपाठ ऋषभ पंतने आपलं शतक पूर्ण केलं. मात्र राहुल आणि पंतने फलंदाजीत ठेवलेली ही लय टीम इंडियाच्या उर्वरित फलंदाजांना कायम ठेवता आली नाही. परिणामी 400 हुन अधिक धावांचं टार्गेट देण्याची अपेक्षा असताना टीम इंडिया (Team India) 364 धावांवर ऑल आउट झाली. टीम इंडियाने इंग्लंडला पहिल्या सामन्यात विजयासाठी 371 धावांचं आव्हान दिलं. 

भारताची प्लेईंग 11 :

यशस्वी जयस्वाल, केएल राहुल, साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकिपर), करुण नायर, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसीध कृष्णा

इंग्लंडची प्लेईंग 11 :

झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ (विकेटकिपर), ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग, शोएब बशीर

Read More