नई दिल्ली: भारत विरुद्ध इंग्लंड पाच सामन्यांची सीरिज सुरू आहे. पहिला सामना ड्रॉ झाला आणि दुसरा सामना सध्या सुरू आहे. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा अनोखा अंदाज पाहायला मिळाला. भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना खेळला जात आहे. हा सामना लॉर्ड्स मैदानावर खेळला जात आहे.
टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मैदानावर आपल्या आक्रमक शैलीमुळे नेहमीच चर्चेत राहणारा कर्णधार कोहली शुक्रवारी लॉर्ड्सच्या बाल्कनीमध्ये मजा करताना दिसला.
विराटचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो पाहून लोक असे म्हणत आहेत की विराट या प्रसिद्ध बाल्कनीमध्ये नागीण डान्स करताना दिसला. विराट त्या काळात खूप आनंदी दिसत होता.
टीम इंडियाचे स्टार सलामीवीर के एल राहुल आणि मोहम्मद सिराज देखील या मजेदार क्षणात विराटसोबत उपस्थित होते.
Kohli doing naagin dance or what ? pic.twitter.com/H9ts7yMwfK
— Ríyu (@peachworld26) August 13, 2021
Moment of the Day.
— Neha Sharma (@imneha30) August 13, 2021
King Kohli dancing in Lord's Balcony.#ViratKohli #ENGvsIND pic.twitter.com/BJeCZNIv68
विराटच्या नागीण डान्स पाहून खेळाडूही हसायला लागले. सिराजने 15 व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर डोम सिबलीला 11 धावांवर बाद केलं. त्यानंतर हसीब हमीद क्लीन बोल्ड झाला. यासाठी सिराजचे खूप कौतुक केले जात आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत सिराजने इंग्लिश फलंदाजांना रोखण्यात यश आलं.
या सामन्यात टीम इंडियाची स्थिती आतापर्यंत खूप चांगली आहे. केएल राहुलचे शानदार शतक आणि रोहित शर्माच्या सर्वोत्तम अर्धशतकाच्या जोरावर टीम इंडियाने पहिल्या डावात 364 धावा केल्या.