Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

'तुम्ही इथे सुट्टी एन्जॉय करायला आला नाहीत...' गावसकरांची बुमराहवर खोचक टीका

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज सुरु आहे. यातील चौथा सामना मँचेस्टरमध्ये खेळवला जातोय. 

'तुम्ही इथे सुट्टी एन्जॉय करायला आला नाहीत...' गावसकरांची बुमराहवर खोचक टीका

IND VS ENG Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. यात आतापर्यंत झालेल्या सामन्यांपैकी एक सामना भारताने तर दोन सामने इंग्लंडने जिंकलेत. परिणामी इंग्लंडने सीरिजमध्ये २-१ ने आघाडी घेतली आहे. पिछाडीवर पडलेल्या टीम इंडियाला (Team India) जर आघाडी घ्यायची असेल तर मँचेस्टरमध्ये होणारा चौथा सामना हा त्यांना काहीही करून जिंकावं लागेल. याच दरम्यान आता सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहबाबत (Jasprit Bumrah) मोठं वक्तव्य केलं आहे. 

जसप्रीत बुमराहला विश्रांती : 

जसप्रीत बुमराहला वर्कलोड मॅनेजमेंटमुळे इंग्लंड विरुद्ध दोन टेस्ट सामन्यात आराम दिला जाऊ शकतो. बुमराहला यापूर्वी बर्लिंघम टेस्टमध्ये सुद्धा आराम दिला गेला होता. त्यानंतर बुमराहच्या फिटनेसबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले. त्यानंतर आता पुन्हा एकदा बुमराहला आराम दिल्यामुळे त्याच्या फिटनेसबाबत   प्रश्न उपस्थित झाले. सुनील गावसकर बुमराहला विश्रांती देण्याबाबत अजिबात सहमत नाहीत. 

गावसकरांनी बुमराहवर केली टीका : 

बुमराहचा वर्क लोड मॅनेजमेंटमुळे मँचेस्टरमध्ये होणाऱ्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये समावेश केला जाणार नाही अशी माहिती मिळतेय. मात्र हे सुनील गावसकर यांना पटलेलं दिसत नाही. सुनील गावसकरांनी म्हटले की, 'कोणताही सुपरस्टार खेळाडू असो त्याला सीरिज दरम्यान ब्रेक दिला गेला नाही पाहिजे'. सुनील गावसकरने सांगितलं की, जे खेळाडूंना पहिल्या तीन टेस्ट सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही त्यांनी ब्रेक दरम्यान इंग्लंडमध्ये घरगुती क्रिकेट खेळायला हवे'. 

हेही वाचा : IND vs ENG: मँचेस्टरमध्ये कसा आहे टीम इंडियाचा रेकॉर्ड? आकडे पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल

 

तुम्ही इथे सुट्टी एन्जॉय करायला आलेला नाहीत : 

माजी क्रिकेटर सुनील गावसकर यांनी सोनी स्पोर्ट्सवर सांगितलं की, 'कोणत्याही सुपरस्टार खेळाडूला ब्रेक घ्यायला नाही पाहिजे. तुम्ही इथे सुट्टीसाठी आलेला नाहीत. तुम्हाला थोडं क्रिकेट खेळायला हवं. तुम्ही भारतासाठी क्रिकेट खेळताय. तुम्ही इथे क्रूजसाठी वगरे आलेला नाहीत'. चौथी टेस्ट 23 जुलै रोजी मँचेस्टरमध्ये खेळली जाणार आहे. तर पाचवा सामना हा लंडनच्या ओव्हल मैदानावर होणार आहे. 

Read More