IND VS ENG 2nd Test : भारत विरुद्ध इंग्लंड (India VS England) यांच्यात 5 सामन्यांची टेस्ट सीरिज खेळवली जात असून यातील दुसरा सामना हा बर्मिंघमच्या एजबेस्टन मैदानावर खेळवला जातोय. रविवार 6 जुलै रोजी या सामन्याचा शेवटचा दिवस असून भारताला विजयापासून केवळ 7 विकेट दूर आहे. भारताने एजबेस्टनमध्ये आजतागायत एकही सामना जिंकलेला नाही. मात्र 58 वर्षांनी भारताला एजबेस्टनमध्ये विजय मिळवण्याची संधी आहे. सामन्याच्या चौथ्या दिवशी भारताकडून फलंदाजी करणाऱ्या ऋषभ पंत (Rishabh Pant) सोबत एक विचित्र घटना घडली. इंग्लंडच्या बॉलिंगवर शॉट खेळत असताना पंतच्या हातून बॅट निसटली आणि ती हवेत फार उंचावर जाऊन खाली पडली. सध्या याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
दुसऱ्या इनिंगमध्ये भारताची 34 वी ओव्हर सुरु असताना इंग्लंडचा गोलंदाज जॉश टंग गोलंदाजी करत होता. तेव्हा ओव्हरच्या चौथ्या बॉलवर पंतने गुडघा जमिनीवर टेकून मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा बॅटचा कंट्रोल त्याच्या हातून सुटला आणि पंतची बॅट हवेत गेली. हे दृश्य पाहून प्रेक्षकांसह खेळाडू सुद्धा त्यांचं हसू रोखू शकले नाहीत. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ऋषभ पंतने दुसऱ्या इनिंगमध्ये 58 बॉलमध्ये 65 धावांची कामगिरी केली. दरम्यान त्याने 8 चौकार आणि 3 षटकार ठोकले. परंतु 47 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर तो बाद झाला. पहिल्या टेस्ट सामन्यात ऋषभ पंतने दोन्ही इनिंगमध्ये शतकीय खेळी केली होती.
हेही वाचा : दुसऱ्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी पावसाची शक्यता, भारताच्या विजयावर फेरणार पाणी?
It's all happening
England Cricket (englandcricket) July 5, 2025
Big swing no ding from Rishabh Pant pic.twitter.com/bJ489vvEYb
सामन्याच्या दुसऱ्या इनिंगमध्ये भारताने चौथ्या दिवशी शुभमनच्या 161 खेळीच्या बळावर 6 विकेट गमावून 427 धावांवर दुसरा डाव घोषित केला होता. आणि पहिल्या डावात मिळालेल्या 180 धावांच्या बळावर भारताने दुसऱ्या डावात 607 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं मोठं आव्हान दिलं. चौथ्या दिवशी इंग्लंडची दुसरी इनिंग सुरु झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी इंग्लंडच्या 3 विकेट घेतल्या. एजबेस्टन टेस्टच्या शेवटच्या दिवशी इंग्लंड समोर विजयासाठी 536 धावांची आवश्यकता असताना भारताला विजयासाठी मात्र केवळ 7 विकेटची आवश्यकता आहे.