Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Ind vs Nz: सामन्यात मोहम्मद सिराजला दुखापत, बॉल टाकताच खाली बसला

मानलं भाऊला दुखापत होऊनही पुन्हा तेवढ्या जोशात उतरला मैदानात

Ind vs Nz: सामन्यात मोहम्मद सिराजला दुखापत, बॉल टाकताच खाली बसला

जयपूर: भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात एक मोठी अपडेट येत आहे. रोहित शर्माने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. 19 ओव्हर 1 बॉल दरम्यान मोहम्मद सीराज जखमी झाला आहे. मोहम्मद सीराजच्या हाताला दुखापत झाली आहे. 

मोहम्मद सिराजच्या तळहाताला दुखापत झाली. सिराज पटकन खाली बसला. हाताला वेदना झाल्याने मैदानात तो खाली बसला. तिथे तातडीने त्य़ाच्या हाताला मलमपट्टी करण्यात आली. सिराजच्या हाताला मलमपट्टी करेपर्यंत खेळ थांबवण्यात आला होता. 

मलमपट्टीनंतर पुन्हा सिराज मैदानात खेळण्यासाठी तेवढ्याच जोशात उतरल्याचं पाहायला मिळालं. टीम इंडियासमोर किवी संघाने 165 धावांचं आव्हान ठेवलं आहे. न्यूझीलंड संघाने 6 गडी गमावून 20 ओव्हरमध्ये 164 धावा केल्या.

टीम इंडिया Playing XI

रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, हर्षल पटेल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, मोहम्मद सिराज

न्यूझीलंड टीम Playing XI

टिम साउथी (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, डॅरिल मिशेल, मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, टिम सेफर्ट, रचिन रवींद्र, मिचेल सॅन्टनर, टॉड अॅस्टल, लॉकी फर्ग्युसन, ट्रेंट बोल्ट

Read More