Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

INDvsNZ: सीरिज जिंकली, आता न्यूझीलंडची परतफेड करा!

न्यूझीलंडविरुद्धच्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा तिसऱ्याच मॅचमध्ये विजय झाला.

INDvsNZ: सीरिज जिंकली, आता न्यूझीलंडची परतफेड करा!

हॅमिल्टन : न्यूझीलंडविरुद्धच्या ५ वनडे मॅचच्या सीरिजमध्ये भारताचा तिसऱ्याच मॅचमध्ये विजय झाला. या सीरिजमध्ये भारतानं ३-०नं आघाडी घेतली आहे. आता गुरुवार ३१ जानेवारीला भारत आणि न्यूझीलंडमध्ये चौथी वनडे होईल. या मॅचमध्ये विजय मिळवून २०१४ सालची परतफेड करण्याची संधी भारताला आहे. २०१४ सालच्या न्यूझीलंड दौऱ्यामध्ये भारताचा ४-०नं पराभव झाला होता. या मॅचपैकी तिसरी मॅच अनिर्णित राहिली होती.

भारतीय टीममध्ये बदल

न्यूझीलंडविरुद्धची चौथी मॅच हॅम्लिटन येथे होणार आहे. न्यूझीलंडविरुद्धचे शेवटचे २ वनडे आणि ३ टी-२० मॅचच्या मालिकेसाठी भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. हॅमिल्टन आणि वेलिंग्टनच्या वनडे आणि त्यानंतर ३ टी-२० मॅचच्या सीरिजसाठी रोहित शर्मा भारतीय टीमचं नेतृत्व करेल. टी-२० मालिकेला ६ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे.

अखेरच्या दोन सामन्यांसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, महेंद्रसिंग धोनी, केदार जाधव, दिनेश कार्तिक, विजय शंकर, शुभमन गिल, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद सिराज, खलील अहमद, रवींद्र जडेजा

टी-२० सीरिजसाठी भारतीय टीम

रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, दिनेश कार्तिक, केदार जाधव, एमएस धोनी, कृणाल पांड्या, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, सिद्धार्थ कौल, खलील अहमद, शुभमन गिल, विजय शंकर, हार्दिक पांड्या

Read More