India VS New Zealand Playing 11 Prediction : चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) मध्ये शेवटचा ग्रुप स्टेज सामना रविवारी भारत विरुद्ध न्यूझीलंड (India VS New Zealand) यांच्यात होणार आहे. या सामन्यानंतर ग्रुप ए मध्ये कोणता संघ टॉपवर असेल यावरून सेमी फायनल कोणत्या संघांमध्ये होणार हे निश्चित होईल. टीम इंडियाने आतापर्यंत झालेल्या दोन्ही सामन्यात विजय मिळवलाय. त्यामुळे न्यूझीलंडला पराभूत करून ग्रुप ए मध्ये नंबर 1 पोझिशन मिळवण्यासाठी टीम इंडिया प्रयत्न करेल. पाकिस्तान विरुद्ध सामन्यादरम्यान रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि मोहम्मद शमी (Mohammad Shami) हे दोघे दुखापतग्रस्त झाले होते. त्यामुळे ते न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात खेळायला उतरणार नाहीत अशी शक्यता आहे. त्यामुळे रविवारच्या सामन्यासाठी टीम इंडियाच्या (Team India) प्लेईंग 11 मध्ये बदल होऊ शकतात.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या ग्रुप ए मध्ये भारत, न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश होता. यापैकी भारताने पहिल्या सामन्यात बांगलादेशचा 60 धावांनी पराभव केला तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानचा 6 विकेट्सने पराभव केला. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत आणि न्यूझीलंड आतापर्यंत केवळ एकदाच समोरा समोर आले आहेत. यात न्यूझीलंडने भारताचा पराभव केला होता. तेव्हा रविवारी होणाऱ्या सामन्यात कोण बाजी मारणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा : एका धावाने 'हा' संघ जिंकणार चॅम्पियन्स ट्रॉफीचं विजेतेपद, दिग्गज क्रिकेटरची भविष्यवाणी
रविवारी होणारा भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. पाकिस्तान विरुद्ध सामन्यादरम्यान भारताचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमीला दुखापत झाल्याने तो काहीकाळ मैदानाच्या बाहेर गेला होता. त्यानंतर तो पुन्हा परतला मात्र त्यांना गोलंदाजीत चांगले यश आले नाही. तसेच कर्णधार रोहित शर्मा सुद्धा याच सामन्यात हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे काही षटके मैदानाबाहेर गेला होता. परंतु काहीवेळाने तो फलंदाजीसाठी उतरला होता. शमी आणि रोहित हे दोघे या दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्ध खेळणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जातं आहे. तेव्हा न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात शमीच्या ऐवजी अर्शदीप सिंहला आणि रोहित शर्मा ऐवजी ऋषभ पंतला संधी मिळू शकते. तर न्यूझीलंड सामन्यात रोहित अनुपस्थित असल्याने उपकर्णधार शुभमन गिल हा संघाचं नेतृत्व करू शकतो.
रोहित शर्मा/ऋषभ पंत, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव/वरुण चक्रवर्ती, मोहम्मद शमी/अर्शदीप सिंह, हर्षित राणा, रवींद्र जडेजा
मिचेल सॅंटनर (कर्णधार), माइकल ब्रेसवेल, डेवोन कॉनवे, मैट हेनरी, टॉम लाथम, विल ओरूर्के, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, केन विल्यम्सन, विल यंग, काइल जेमीसन