Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

VIDEO: ड्रिंक ब्रेकवेळी दिसला रोहित शर्माचा रुद्रावतार, टिम प्लेयरवर भडकला; नेमकं काय झालं? तुम्हीच पाहा!

Rohit Sharma Angry: 

VIDEO: ड्रिंक ब्रेकवेळी दिसला रोहित शर्माचा रुद्रावतार, टिम प्लेयरवर भडकला; नेमकं काय झालं? तुम्हीच पाहा!

Rohit Sharma Angry: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना दुबईमध्ये खेळला जातोय.  न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. किवीज संघाने चांगली सुरुवात केल्यानंतर भारताच्या फिरकी गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले.  पण यावेळी कर्णधार रोहित शर्माचा रुद्रावतार सर्वांना पाहायला मिळाला. रोहित शर्मा भडकल्याचे साऱ्यांनी पाहिले. त्यावेळी नक्की काय झाल? सविस्तर जाणून घेऊया. 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड या 2 बलाढ्य टीममध्ये खेळला जातोय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. जिथे न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. कॅप्टन रोहितने शर्माने टीमला एक चांलगी सुरुवात करुन दिली. अवघ्या 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. 

रोहित शर्मा का भडकला?

टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा उपकर्णधार शुभमन गिलवर भडकल्याचे पाहायला मिळाले. रोहित शर्मा गिलला ओरडला आणि त्याला बोलावले. खरंतर विल यंग आणि रचिन रवींद्र यांच्यात चांगली भागीदारी सुरू होती. त्यानंतर वरुण चक्रवर्तीने यंगला 15 रन्सवर आणि त्यानंतर कुलदीप यादवने रचिन रवींद्रला 37 रन्स आणि केन विल्यमसन यांना बाद केले. यानंतर टीम इंडियाचे जोरदार पुनरागमन झाले. यानंतर ड्रिंक ब्रेकमध्ये रोहित शर्मा आपल्या सर्व खेळाडूंना घेऊन पुढचे गेम प्लानिंग आखत होता. हे होत असताना सर्व टिम मेंबर्स तिथे होते पण शुभमन गिल भलतीकडेच भटकत होता. रोहित शर्माच्या हे लक्षात आले.मग रोहित शर्माचा पारा चढला आणि त्याने शुभमन गिलला फटकारले. शुभमन गिलला टीम मेंबर्सपासून दूर असल्याने रोहित शर्माला राग आला. त्याने ओरडून गिलला टीम हर्डलकडे बोलावले.

सामन्यात न्यूझीलंडकडून 251 धावा 

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टीम इंडियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीत किवी संघाची सुरुवात फारशी फारशी चांगली झाली नाही. पहिल्या विकेटसह, भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट केली आणि नियमित अंतराने यश मिळवले.
डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी किवी संघासाठी निश्चितच काही वेळ क्रीजवर घालवला. दोघांनीही न्यूझीलंडकडून अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी गोलंदाजीत आपली हुशारी दाखवली आणि प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. अशाप्रकारे टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत न्यूझीलंडला फक्त 251 धावांवर रोखले.

Read More