Rohit Sharma: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड या 2 बलाढ्य टीममध्ये खेळला जातोय. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आपल्या तुफानी फलंदाजीने खळबळ उडवून दिली. दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जातोय. जिथे न्यूझीलंडविरुद्ध 252 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी टीम इंडिया मैदानात उतरली आहे. कॅप्टन रोहितने शर्माने टीमला एक चांलगी सुरुवात करुन दिली. अवघ्या 41 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याच्या खेळीदरम्यान क्रिकेटप्रेमींनी रोहित शर्मा आणि त्याची पत्नी रितीका यांच्यातील प्रेमाचा एक प्रसंग पाहिला. ज्याची खूप चर्चा सोशल मीडियात रंगलीय. काय आहे हा प्रसंग? सविस्तर जाणून घेऊया.
टीम इंडियाच्या डावाच्या चौथ्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर रोहित शर्माला अचानक खोकला येऊ लागला. रोहित शर्मासाठी डगआउटमधून लगेच पाणी आणण्यात आले. रोहित सतत खोकत होता. ज्यामुळे खेळ काही काळ थांबवावा लागला. रोहितची पत्नी रितीका स्टेडियममध्येच होती. पण तिच्या चेहऱ्यावर अस्वस्थ असे हावभाव होते. तिचा चेहरा तणावाने पूर्णपणे फिकट पडला होता. असे असले तरी पाणी प्यायल्यानंतर रोहितला बरे वाटले आणि त्यानंतर त्याने खेळ सुरू ठेवला. रोहित शर्माने पुन्हा फलंदाजी सुरू करताच रितिकाच्या चेहऱ्यावर हास्य परत आल्याचे दिसले.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने टीम इंडियाविरुद्ध नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीत किवी संघाची सुरुवात फारशी फारशी चांगली झाली नाही. पहिल्या विकेटसह, भारतीय गोलंदाजांनी आपली पकड घट्ट केली आणि नियमित अंतराने यश मिळवले.
डॅरिल मिशेल आणि मायकेल ब्रेसवेल यांनी किवी संघासाठी निश्चितच काही वेळ क्रीजवर घालवला. दोघांनीही न्यूझीलंडकडून अर्धशतकी खेळी केली. टीम इंडियाकडून कुलदीप यादव आणि वरुण चक्रवर्ती यांनी गोलंदाजीत आपली हुशारी दाखवली आणि प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. याशिवाय मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली. अशाप्रकारे टीम इंडियाने निर्धारित 50 षटकांत न्यूझीलंडला फक्त 251 धावांवर रोखले.