Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs PAK : भारताच्या पराभवानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीच्या फोटोवर भडकले नेटकरी, संजना गणेशनने दिलं चोख प्रत्युत्तर

संजना गणेशनने बुमराहसोबत एक फोटो शेअर केला आहे

IND vs PAK : भारताच्या पराभवानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीच्या फोटोवर भडकले नेटकरी, संजना गणेशनने दिलं चोख प्रत्युत्तर

आशिया चषक-2022 च्या (asia cup 2022) सुपर-4 फेरीत रविवारी भारतीय संघाला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानने (ind vs pak) 5 गडी राखून पराभूत केले. गोलंदाजीमुळे भारताला पराभवाला सामोरं जावं लागल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (jasprit bumrah) या स्पर्धेतून बाहेर पडला आहे. दुखापतीमुळे तो संघासोबत दुबईला जाऊ शकला नाही. दरम्यान, त्यांची पत्नी संजना गणेशनने (sanjana ganesan) सोशल मीडियावर एक जुना शेअर केला आहे. मात्र  काही सोशल मीडियावरील युजर्सनी त्याचा संबंध भारत-पाक सामन्याशीच जोडला.

संजनाने शेअर केला जुना फोटो 

जसप्रीत बुमराहची पत्नी आणि टीव्ही प्रेझेंटर संजना गणेशनने सोशल मीडियावर एक जुना फोटो शेअर केला आहे. फोटोमध्ये बुमराह आणि संजना एका यॉटवर बसलेले दिसत आहेत.  संजनाने कॅप्शनमध्ये देखील हा फोटो जुना असल्याचे सांगितले आहे. मात्र अनेकांनी ते समजून घेण्यात चूक केली आहे. काहींना युजर्सना वाटले की हे जोडपे सुट्टी एन्जॉय करत आहे. 

संजनाच्या या पोस्टवर एका युजरने अतिशय अश्लील कमेंट केली आहे. त्याने पोस्टला भारत-पाकिस्तान सामन्याशी जोडले आणि बुमराहने सुट्टी सोडून मैदानात परतावे असं म्हटलं आहे. मात्र, यामध्ये युजरने अपशब्दांचाही वापर केला आहे

हे पाहून चिडलेल्या संजनाने ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे. "हा जुना फोटो आहे, दिसत नाही का? चोमू.." असे संजनाने म्हटलं आहे.

fallbacks

दरम्यान, भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह पाठीच्या दुखापतीमुळे तो आशिया चषक स्पर्धेत सहभाही होऊ शकला नाही.

Read More