Asia Cup 2022 ind vs pak : आशिया कपमध्ये रविवारी भारत आणि पाकिस्तानमधील हाय व्होल्टेज सामन्यात भारताने थरारक विजय मिळवला. हार्दिक पांड्या आणि रविंद्र जडेजाने संयमी खेळी करत सामना भारताच्या बाजूने झुकवला. त्यानंतर सिक्सर मारत सामन्याचा हिरो जरी पांड्या झाला असला तरी सोशल मीडियावर दिनेश कार्तिकचं मोठ्या प्रमाणात कौतुक करताना दिसत आहे. (Kartik Pandya Photo Viral)
जडेजा आणि हार्दिकने सामना विजयाच्या उंबरठ्यावर आणून ठेवला असताना जडेजा बाद झाला. त्यानंतर दिनेश कार्तिक मैदानात उतरला तेव्हा भारताला 5 चेंडूमध्ये 7 धावांची गरज होती. कार्तिकने एक धाव घेतली आणि पांड्या स्ट्राईकवर आला, एक चेंडू निर्धाव गेल्यावर पांड्याने चौथ्या चेंडूवर गगनचुंबी षटकार ठोकत विजायावर शिक्कामोर्तब केलं.
Dinesh Karthik is representing whole India right now. Respect for you man
— Abhay (@abhu_0701) August 28, 2022
Thank you for this win Hardik @hardikpandya7 #INDvsPAK #AsiaCup2022 #HardikPandya pic.twitter.com/UeOp0QnFqH
भारत जिंकल्यावर सर्वजण आनंद साजरा करत होते. यादरम्यान कार्तिकने पांड्याचा आदर करत त्याच्यासमोर झुकत त्याला शाबासकी दिली. तसं पाहायला गेलं तर कार्तिक हा संघातील सीनिअर खेळाडू आहे. कार्तिकने संघात एकसारखा नव्हता मात्र त्याचा संघर्षही तेवढा मोठा आहे.
कार्तिकच्या या कृतीचा सोशल मीडियावर फोटो तुफान व्हायरल झाला आहे. कार्तिकने सामन्यामध्ये एक फुल स्ट्रेच करत झेल घेतला होता. फलंदाजीला आला तेव्हा एक धाव घेतली होती. मात्र कार्तिकने पांड्याची ज्या प्रकारे पाठ थोपटली त्यामध्ये त्याने सर्वांची मने जिंकली. कार्तिकने आपल्या कृतीतून दाखवून दिलं की, चांगल्या गोष्टीचं कौतुक करताना तुमचा अनुभव आणि वय कधी आडवं येऊ देऊ नका.