Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळायला उतरण्याआधीच रोहितच्या नावावर नकोसा विक्रम; पहिल्यांदाच असं घडलं की...

Champions Trophy 2025 : संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या भारत - पाक सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता पार पडला. यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने टॉस जिंकला. 

पाकिस्तानविरुद्ध मैदानात खेळायला उतरण्याआधीच रोहितच्या नावावर नकोसा विक्रम; पहिल्यांदाच असं घडलं की...

Champions Trophy 2025 : 19 फेब्रुवारी पासून सुरु झालेली चॅम्पियन्स ट्रॉफीची (Champions Trophy 2025) स्पर्धा आता रंगात आलीये. 23 फेब्रुवारी रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान (India VS Pakistan) यांच्यात स्पर्धेचा पाचवा सामना खेळवला जात असून तो दुबईच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष लागून असलेल्या भारत - पाक सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता पार पडला. यात पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) याने टॉस जिंकला. त्यामुळे भारताचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नावावर क्रिकेट इतिहासात नकोसा विक्रम नोंदवला गेला. 

आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडिया सर्व सामने हे दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळेल. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यापूर्वी दोन्ही संघांच्या कर्णधारांमध्ये टॉस झाला. हा टॉस पाकिस्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान याने जिंकला असून त्याने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. तर टीम इंडियाला प्रथम गोलंदाजीचे आव्हान दिले. टीम इंडियाने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये कोणतेही बदल केलेले नाही. तर पाकिस्तानने देखील तीच प्लेईंग 11 ठेवली असून फक्त दुखापतग्रस्त फखर जमा ऐवजी इमाम-उल-हक याला संधी दिली आहे. 

रोहितच्या नावावर नकोसा विक्रम : 

पाकिस्तान विरुद्ध टॉस हरल्यावर कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नकोसा विक्रम नोंदवला गेला आहे. भारताने वनडे फॉरमॅटमध्ये वर्ल्ड कप 2023 फायनल पासून ते आतापर्यंत सलग 12 वेळा टॉस हरला आहे. त्यामुळे सलग 12 वेळा वनडे फॉरमॅटमध्ये टॉस हरण्याची विक्रम भारत आणि कर्णधार रोहित शर्माच्या नावावर नोंदवला गेलाय. यापूर्वी नेदरलँडच्या नावावर हा रेकॉर्ड होता त्यांनी 2011 ते 2013 या वर्षी वनडेत सलग 11 वेळा हरला होता. मात्र आता भारताने नेदरलँडचा रेकॉर्ड मोडला आहे. 

हेही वाचा : पाकिस्तान सोडा, टीम इंडियासाठी पुढचा पेपर अधिक अवघड! आजच्या सामन्यानंतर भारत सेमी-फायनलमध्ये कसा पोहोचणार?

काय म्हणाला रोहित शर्मा? 

कर्णधार रोहित शर्मा याने टॉस झाल्यावर म्हटले की, 'त्यांनी नाणेफेक जिंकल्याने काही फरक पडत नाही, आम्ही प्रथम गोलंदाजी करू. आमच्याकडे फलंदाजीत अनुभवी युनिट आहे त्यामुळे खेळपट्ट्या कमी झाल्यास काय करावे लागेल हे आम्हाला माहीत आहे. एकंदरीत संपूर्ण संघाकडून आम्हाला चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे'. 

भारताची प्लेईंग 11 : 

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकिपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, हर्षित राणा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव

पाकिस्तानची प्लेईंग 11 :

इमाम-उल-हक, बाबर आझम, सौद शकील, मोहम्मद रिझवान (कर्णधार), सलमान आगा, तय्यब ताहिर, खुशदिल शाह, शाहीन आफ्रिदी, नसीम शाह, हरिस रौफ, अबरार अहमद

About the Author

Pooja Pawar 

... Read more
Read More