Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND Vs SA ODI: मोहम्मद सिराज, रवि बिष्णोईला झालंय तरी काय! Catch सोडल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांचं गचाळ क्षेत्ररक्षण दिसून आलं. शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि रवि बिष्णोई यांनी झेल सोडले.

IND Vs SA ODI: मोहम्मद सिराज, रवि बिष्णोईला झालंय तरी काय! Catch सोडल्यानंतर नेटकऱ्यांचा संताप

India Vs South Africa 1st One Day Match: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्या एकदिवसीय सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिल्याच सामन्यात भारतीय फलंदाजांचं गचाळ क्षेत्ररक्षण दिसून आलं. शुबमन गिल, मोहम्मद सिराज आणि रवि बिष्णोई यांनी झेल सोडले. आवेश खानच्या गोलंदाजीवर दोन झेल एका पाठोपाठ एक सोडले. यामुळे भारतीय क्रीडाप्रेमींनी सोशल मीडियावर संताप व्यक्त केला आहे. यापूर्वी मोहम्मद सिराजने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या शेवटच्या टी 20 सामन्यात दोन झेलचं रुपांतर दोन सिक्समध्ये झालं होतं. आणि 12 धावा आल्या होत्या.

यापूर्वी शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर शुबमन गिलनं झेल सोडला होता. संघाचं आठवं षटक कर्णधार शिखर धवननं शार्दुल ठाकुरच्या हाती सोपवलं होती. या षटकातील दुसऱ्या चेंडूवर जानेमन मलानची कट स्लीपला उभ्या असलेल्या शुबमन गिलच्या हाती गेली. मात्र त्याला हा झेल पकडता आला नाही आणि जीवदान मिळालं.  गचाळ क्षेत्ररक्षण पाहता नेटकऱ्यांनी सोशल मीडियावर टीकास्त्र सोडलं आहे. 

दक्षिण आफ्रिका संघ: जानेमन मलान, क्विंटन डिकॉक, टेम्बा बावुमा, एडन मार्कम, हेन्रिच क्लासेन, डेविड मिलार, वायन पारनेल, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी, टबरेज शम्सी

भारत संघ: शिखर धवन, शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, इशान किशान, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन, शार्दुल ठाकुर, कुलदीप यादव, रवि बिष्णोई, मोहम्मद सिराज, आवेश खान  

Read More