Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs Sa, 2nd T20: भारताची फलंदाजी ढेपाळली, दक्षिण आफ्रिकेसमोर 149 धावांचे लक्ष्य

दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याला टीम इंडियाची फलंदाजी चांगलीच गडगडली आहे.

IND vs Sa, 2nd T20: भारताची फलंदाजी ढेपाळली, दक्षिण आफ्रिकेसमोर 149 धावांचे लक्ष्य

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्याला टीम इंडियाची फलंदाजी चांगलीच गडगडली आहे. श्रेयस अय्यरने 40, ईशान किशनने 34 आणि कार्तिक नाबाद 30 च्या बळावर भारताने धावसंख्या 148 वर पोहोचवली आहे. आता दक्षिण आफ्रिकेसमोर 149 धावांचे लक्ष्य असणार आहे. 

दुसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याने भारताला प्रथम फलंदाजी दिली आहे. भारताची सुरुवात काहीशी चांगली झाली नाही.

 श्रेयस अय्यर 40  आणि ईशान किशनने 34, ऋतुराज गायकवाड 1 धावा, रिषभ पंत 5, हार्दिक पंड्या 9, अक्षर पटेल 10, कार्तिक 30, हर्षल पटेल 12 धावा केल्या आहेत. 

Read More