Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs SA : के एल राहुलला मैदानात बेस्ट फ्रेंण्डची येणार आठवण

वन डे सामन्यात के एल राहुल आपल्या बेस्ट फ्रेंण्डला करणार मिस

IND vs SA  : के एल राहुलला मैदानात बेस्ट फ्रेंण्डची येणार आठवण

मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सध्या तीन कसोटी सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. पहिला कसोटी सामना टीम इंडियाने जिंकला आहे. तर दुसरा कसोटी सामना  3 जानेवारीपासून सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिका विरुद्ध वन डे सामना खेळण्यात येणार आहे. या वन डे सामन्यासाठी रोहित शर्मा कर्णधार असणार नाही. 

रोहित शर्मा दुखापतीमुळे वन डे सीरिजमधून बाहेर असणार आहे. त्याऐवजी के एल राहुलच्या खांद्यावर कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. याच वेळी के एल राहुल दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आपल्या खास व्यक्तीला मिस करत असल्याची चर्चा आहे. 

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू आणि कर्णधार केएल राहुलचा खास मित्र हार्दिक पांड्याला दक्षिण आफ्रिका मालिकेतून वगळण्यात आलं. फिटनेच्या कारणामुळे खेळाडू बऱ्याच दिवसांपासून अडचणीत आहे. टी-20 वर्ल्ड कप दरम्यानही हार्दिकच्या निवडीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं होतं. 

न्यूझीलंड मालिकेत त्याला विश्रांती देण्यात आली होती. आता दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी पांड्याने काही काळ क्रिकेटपासून दूर राहणार असल्याचं स्पष्ट केलं. हार्दिक आणि के एल राहुल खास मित्र असल्याचं सगळ्यांनाच माहीत आहे. त्यामुळे के एल राहुल हार्दिकला मैदानावरही मिस करणार आहे.

हार्दिक पांड्या गेल्या काही सामन्यांमध्ये फ्लॉप ठरला. तर दुसरीकडे आता रोहित शर्मा वन डे सामना दुखापतीमुळे खेळणार नाही. के एल राहुलच्या खांद्यावर कर्णधारपद तर बुमराहच्या खांद्यावर उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. के एल राहुल वन डे टीमची मोट कशी बांधणार याकडे BCCI च्या मॅनेजमेंटसह क्रिकेटप्रेमींचंही लक्ष आहे. 

Read More