Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

27 वर्षांच्या युवा स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात,पंत दाखवणार बाहेरचा रस्ता

ऋषभ पंत दुसऱ्या टी 20 सामन्याआधी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो.

27 वर्षांच्या युवा स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात,पंत दाखवणार बाहेरचा रस्ता

मुंबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 चा दुसरा सामना होणार आहे. या सामन्याआधी टीम इंडियातून एका मोठ्या बातमीची चर्चा आहे. टीम इंडियातील स्टार खेळाडूचं करिअर धोक्यात आहे. वयाच्या 27 व्या वर्षी त्याचं करिअर धोक्यात येणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्याचा टीम इंडियातून पंत पत्ता कटही करू शकतो अशी चर्चा आहे. 

ऋषभ पंत दुसऱ्या टी 20 सामन्याआधी प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकतो. यावेळी या स्टार खेळाडूला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळू शकणार नाही. तर उमरान मलिक आणि अर्शदीपला कदाचित डेब्यूच्या संधीसाठी वाट पाहावी लागू शकते. 

या खेळाडूला टीम इंडियात स्थान मिळणं कठीण 

27 वर्षांच्या व्यंकटेश अय्यरला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणं कठीण आहे. हार्दिक पांड्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट्य करण्यात आलं आहे. व्यंकटेश अय्यरला मात्र प्लेइंग इलेव्हनमधून बाहेर ठेवलं जाण्याची शक्यता आहे. 

व्यंकटेश अय्यर टी-20 वर्ल्ड कप 2021 पासून सतत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग होता. पण त्यावेळी हार्दिक पंड्या जखमी झाला होता. हार्दिक पांड्याच्या पुनरागमनामुळे व्यंकटेश अय्यरच्या कारकिर्दीला मोठा फटका बसत आहे. अय्यरला आता संघात हार्दिक पांड्याचा बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे.

टीम इंडियामध्ये आपल्या शानदार खेळाने छाप सोडणारा व्यंकटेश अय्यर सध्या खराब फॉर्मशी झुंजत आहे. आयपीएल 2022 मध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळताना व्यंकटेश अय्यरची कामगिरी खूपच खराब झाली. त्याने आयपीएल 2022 मध्ये खेळल्या गेलेल्या 12 सामन्यांमध्ये 16.55 च्या सरासरीने केवळ 182 धावा केल्या. खराब खेळामुळे त्याला संघातूनही वगळण्यात आले होते.

 

Read More