IND vs SL 2nd T20I: बॉलिवूडची जादू काय आहे हे वेगळ्य़ानं सांगण्याची गरज नाही. इथली गाणी, चित्रपट सगळंतच कसं एक नंबर. म्हणूनच की काय अगदी क्रीडा जगतापर्यंत या बॉलिवूडची जादू पाहायला मिळत आहे. कशी? अहो कशी काय विचारता, भारतीय क्रिकेट संघातील खेळाडूच हे दाखवून देत आहे.
भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) या दोन्ही संघांमधील दुसरा टी20 सामना हिमाचलच्या धरमशाला येथे खेळला जात आहे. याच सामन्यासाठी भारतीय क्रिकेट संघ खासगी विमानानं धरमशाला येथे पोहोचला.
यावेळी संघातील खेळाडू मजा मस्तीच्या मूडमध्ये दिसले. कोण गाणं गात होतं, तर कोणी नाचत होतं.
बीसीसीआयकडून या धमाल मजा मस्तीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आणि पाहता पाहता तो व्हायरल झाला.
इथं गोलंदाज मोहम्मद सिराज 'मै हूँ ना...' हे गाणं गाताना दिसत आहे. तर त्याला संघातील इतर खेळाडूंचीही साथ मिळताना दिसत आहे.
चांगला खेळ करण्याचं दडपण असतानाच खेळाडूंचा हा अंदाज म्हणजे दडपण कितीही असो, आनंदाचा आस्वाद घ्यायला आम्ही विसरत नाही, याचीच ग्वाही देत होता.
Match Day
— BCCI (@BCCI) February 26, 2022
Onto the 2nd @Paytm #INDvSL T20I at Dharamsala #TeamIndia pic.twitter.com/iAGh8FDrwt
दुसऱ्या टी20 सामन्यासाठी असे असतील दोन्ही देशांचे संघ
भारत : रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर , संजू सॅमसन, दीपक हूडा, व्यंकटेश अय्यर, रवींद्र जडेजा, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, युजवेंद्र चहल
श्रीलंका : दसुन शनाका (कर्णधार), दनुष्का गुनाथिलका, पथुम निसानका, चरिथ असालंका , जनिथ लियानगे, निरोशन डिकवाला (यष्टीरक्षक), चमिका करुणारत्ने, दुष्मंथा चमीरा, जेफ्री वांडेरसे , प्रवीन जयविकर्मा, लाहिरु कुमारा