Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs SL T20 : टीम इंडियाच्या 2 धुरंधर खेळाडूंनी वाढवली श्रीलंकेची डोकेदुखी

या दोन धुरंधर खेळाडूंच्या एन्ट्रीनं श्रीलंकेच्या टीमला फुटणार घाम, पाहा कोण आहेत 2 धडाकेबाज क्रिकेटपटू

IND vs SL T20 : टीम इंडियाच्या 2 धुरंधर खेळाडूंनी वाढवली श्रीलंकेची डोकेदुखी

मुंबई : भारत विरुद्ध श्रीलंका टी 20 सीरिजमधील पहिला सामना आज लखनऊ इथे खेळवण्यात येणार आहे. 6.30 वाजता संध्याकाळी टॉस होणार असून 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या सामन्यासाठी नागरिकांना स्टेडियममध्ये परवानगी देण्यात आली नाही. 

टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध पहिला टी 20 सामन्यासाठी आज मैदानात उतरणार आहे. आज मैदानात विराट कोहली, दीपक चाहर आणि सूर्यकुमार यादव दुखापतीमुळे उतरणार नाही. मात्र असं असलं तरी तगडी टीम घेऊन रोहित शर्मा मैदानात उतरणार आहे.

2 धडाकेबाज क्रिकेटपटूंना टीम इंडियामध्ये समाविष्ट करण्यात आलं आहे. हे खेळाडू संघात आल्याने टीम इंडियाची ताकद वाढली असून आता श्रीलंकेच्या खेळाडूंचं टेन्शन वाढलं आहे. 

विराट कोहलीच्या जागी श्रेयस अय्यर मैदानात उतरणार आहे. वेस्टइंडीज विरुद्ध तिसऱ्या टी 20 मध्ये 80 धावा अय्यरने केल्या होत्या. याशिवाय संजू सॅमसनला देखील संघात समाविष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे संघाला आता मजबूती देण्यात आली आहे.

Read More