Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

इमरान ताहिरने टीम इंडियाच्या चाहत्यावर लावला 'हा' आरोप

दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर इमरान ताहिरने आरोप केला आहे.

इमरान ताहिरने टीम इंडियाच्या चाहत्यावर लावला 'हा' आरोप

पोर्ट एलिजाबेथ : दक्षिण आफ्रिकेचा स्पिनर इमरान ताहिरने आरोप केला आहे.

विराट कोहलीच्या टीम विरूद्धच्या चौथ्या एक दिवशीय आंतरराष्ट्रीय मॅचमध्ये भारताच्या चाहत्याने आपल्याला वर्ण भेदावरून हिणवल्याचा आरोप केला आहे. याच्या चौकशीसाठी क्रिकेट बोर्डाकडे तक्रार केली आहे. 

ताहिर शनिवारी जोहानिसबर्गमध्ये पावसामुळे खेळला नव्हता. ज्यामध्ये भारत 5 विकेटने हरला होता. दक्षिण आफ्रिकेच्या टीम मॅनेजर मोहम्मद मूसाजीने सांगितले की, ताहिर 12 व्या खेळाडूची भूमिका सांभाळत होता त्यावेळी त्याच्या वर्णभेदाची टिप्पणी झाली. 

मुसाजीने सांगितले की, मला इमरानच्या गोष्टीवरून जे समझलं की, पूर्ण मॅच दरम्यान एक व्यक्ती तोंडी वर्ण भेदावरून सतत त्याला टिपणी करत होतो. त्याने ड्रेसिंग रूम समोर असणाऱ्या सुरक्षा रक्षकांच्या समोर याबाबत सांगितलं आणि त्याबाबत चौकशी देखील केली. 

Read More