Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

IND vs WI : जिंकता-जिंकता हरली वेस्ट इंडिज; पहिल्या वनडेत भारताचा 3 रन्सने विजय

शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीमने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पहिला विजय मिळवला आहे.

IND vs WI : जिंकता-जिंकता हरली वेस्ट इंडिज; पहिल्या वनडेत भारताचा 3 रन्सने विजय

मुंबई : भारताने पहिल्या एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजचा 3 रन्सने पराभव केला. मोहम्मद सिराजने टाकलेल्या सामन्यातील शेवटच्या ओव्हरमध्ये वेस्ट इंडिजला 15 रन्स करायचे होते. मात्र विरोधी टीम केवळ 11 रन्स करू शकली. या विजयासह भारताने सिरीजमध्ये 1-0 ची आघाडी घेतलीये. शिखर धवनच्या नेतृत्वाखाली टीमने वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर पहिला विजय मिळवला आहे.

पहिला सामना भारताने जिंकला असला तरी वेस्ट इंडीजच्या खेळाडूंनी दिलेली चांगली झुंज दिली. टीम इंडियाने समोरच्या टीमला 309 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या टीमने चांगला खेळ केला. 

विंडीजकडून काईल मेयर्सने 75 आणि ब्रँडन किंगने 54 रन्स केले. रोमॅरियो शेफर्ड (39) आणि अकील हुसेन (33) यांनी नाबाद भागीदारी करत विंडीजला विजय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र अवघ्या 3 रन्सनी वेस्ट इंडिजचा पराभव झाला. 

वेस्टइंडिजचा कॅप्टन निकोलस पूरनने टॉस जिंकत फिल्डिंगचा निर्णय घेतला होता. टीम इंडियाने प्रथम फलंदाजीला केली. यावेळी शिखर धवन आणि शुभमन गिलने भारताच्या डावाला चांगली सुरूवात करून दिली होती. शुभमन गिलने 53 बॉलमध्ये 64 रन्स केले. 

दुसरीकडे श्रेयस अय्यरने 54 रन्स केले. यानंतर सुर्यकुमार 13, संजू 12, दिपक हुडा 27, अक्षर पटेलने 21 धावा केल्या. या धावांच्या बळावर टीम इंडियाने 308 धावसंख्या गाठली होती. मात्र विजयासाठी हे लक्ष्य गाठण्यात वेस्ट इंडिज अपयशी ठरली.

Read More