अहमदाबाद : टीम इंडिया सध्या घरच्या मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध (Ind vs Wi) एकदिवसीय मालिका खेळत आहे. मालिकेतील दुसऱ्या सामन्यात भारताचा ऑफस्पिनर दीपक हुड्डा (Deepak Hooda) याने आश्चर्यकारक कामगिरी केली. त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील हा दुसरा सामनाही होता, मात्र या सामन्यात त्याला प्रथमच गोलंदाजी करण्याची संधी मिळाली. त्याचा फायदा उठवत त्याने पहिल्याच षटकात आपल्या वनडे कारकिर्दीतील पहिली विकेट घेतली. (Deepak Hooda First wicket of ODI carrer)
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra modi Stadium) बुधवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात दीपकला आणखी एक संधी मिळाली. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 50 षटकांत 9 गडी गमावून 237 धावा केल्या.
ब्रुक्स ठरला पहिला बळी
भारतीय कर्णधार रोहित शर्माने 31 वी ओव्हर ऑफस्पिनर दीपक हुडाला दिली. दीपकची वनडे कारकिर्दीतील ही पहिलीच ओव्हर होती. त्याच षटकातील 5व्या चेंडूवर दीपकने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिली विकेटही घेतली. दीपकने ब्रुक्सला माघारी पाठवले.
दीपकने ऑफ ब्रेक चेंडू ऑफ स्टंपजवळ टाकला होता. त्यानंतर ब्रूक्सने पुढे जाऊन लाँग ऑनच्या दिशेने हवेत एक शॉट मारला. ब्रुक्स चेंडूला मध्यभागी ठेवू शकला नाही. त्यामुळेच चेंडू हवेत खूप उंच गेला, पण अंतर सापडले नाही आणि सूर्यकुमारने सीमारेषेवर सोपा झेल घेतला.
ब्रूक्सच्या 44 धावा
ब्रुक्सने 64 चेंडूत 44 धावांची खेळी केली. या खेळीत त्याने दोन चौकार आणि 2 षटकार लगावले. पण दीपक हुडाने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
IND vs WI: दीपक हुड्डाने करिअरच्या पहिल्याच ओव्हरमध्ये केली कमाल
Updated: Feb 09, 2022, 09:21 PM IST
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर बुधवारी झालेल्या एकदिवसीय सामन्यात दीपकला आणखी एक संधी मिळाली.

By clicking “Accept All Cookies”, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.