Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

मी बोलतोय ना तर घे... Virat Kohli ने Rohit Sharma कडे केला जेव्हा आग्रह

India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन T20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या मैदानावर खेळला गेला. या सामन्यात एक क्षण असा आला जेव्हा विराट कोहलीच्या सांगण्यावरून रोहित शर्माने रिव्ह्यू घेतला.

मी बोलतोय ना तर घे... Virat Kohli ने Rohit Sharma कडे केला जेव्हा आग्रह

मुंबई : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना कोलकात्याच्या मैदानावर रंगला. या सामन्यात कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. सामन्यादरम्यान एक विलक्षण घटना पाहायला मिळाली. जेव्हा रोहित शर्माने विराट कोहलीच्या सांगण्यावरून रिव्ह्यू घेतला.

विराटच्या सांगण्यावरून घेतला रिव्ह्यू

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या T20 सामन्यात कर्णधार रोहित शर्माने विराट कोहलीच्या सांगण्यावरून रिव्ह्यू घेतला. रोहित शर्मा अजिबात डीआरएस घेण्याच्या मूडमध्ये नव्हता, पण विराटने त्याला विचारल्यावर त्याने विचार न करता रिव्ह्यू घेण्याचे ठरवले. जेव्हा रोस्टन चेस १६व्या षटकात रवी बिश्नोईच्या पाचव्या चेंडूवर फलंदाजी करत होता. त्यानंतर चेंडू पॅड आणि बॅटमधून जातो आणि ऋषभ पंतच्या हातात जातो. गोलंदाजासह सर्व खेळाडू अपील करतात, परंतु पंच अपील पूर्णपणे फेटाळतात. यानंतर विराट रोहितकडे येतो आणि म्हणतो, बॅट आणि पॅड दोन्ही लागले आहेत. 'दोन आवाज आले, मी बोलतोय ना तर घे'

विराट कोहलीच्या सांगण्यावरून रोहित शर्मा रिव्ह्यू घेतो. नंतरच्या रिप्लेमध्ये स्पष्टपणे दिसून येते की चेंडू रोस्टन चेसच्या बॅटला लागला नाही, ज्यामुळे वेस्ट इंडिजच्या फलंदाजाला नाबाद दिले गेले. मात्र, यानंतर रोस्टन चेसला कोणताही चमत्कार दाखवता आला नाही आणि केवळ 4 धावा करत तो बाद झाला.

वेस्ट इंडिजने भारतीय संघाला विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य दिले होते. वेस्ट इंडिजकडून निकोलस पूरनने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 61 धावांची खेळी खेळली. या सामन्यात टीम इंडियाच्या गोलंदाजांनी शानदार खेळ दाखवत विंडीजच्या फलंदाजांना हात उघडण्याची एकही संधी दिली नाही. रवी बिश्नोईने एकाच षटकात दोन बळी घेत वेस्ट इंडिज संघाच्या फलंदाजांचे कंबरडे मोडले. त्याने चार षटकांत १७ धावा दिल्या. त्याचवेळी हर्षल पटेलनेही दोन गडी बाद केले.

Read More