Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

वेगाचा बादशाह यंदा IPL खेळणार? 156.7 Kmph ने गोलंदाजी करणाऱ्या भारतीयाची जोरदार चर्चा

Indian Pace Sensation To Play IPL 2025 Opener: 22 मार्चपासून इंडियन प्रिमिअर लीगची सुरुवात होत असून त्यापूर्वीच चाहत्यांसाठी एक गुड न्यूज समोर येत आहे.

वेगाचा बादशाह यंदा IPL खेळणार? 156.7 Kmph ने गोलंदाजी करणाऱ्या भारतीयाची जोरदार चर्चा

Indian Pace Sensation To Play IPL 2025 Opener: 22 तारखेपासून इंडियन प्रिमिअर लीगचं 18 वं पर्व सुरु होतं आहे. या पर्वामध्ये कोण खेळणार कोण नाही याबद्दलची उत्सुकता लागून राहिलेली असतानाच ऑक्टोबर महिन्यानंतर मैदानापासून दूर असलेल्या एका क्रिकेटपटूच्या खेळण्याबद्दल विशेष उत्सुकता आहे. खरं तर या खेळाडूने सरावही सुरु केला आहे. मात्र हा खेळाडू ज्या आयपीएल संघाकडून खेळणार आहे तो संघ भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून या खेळाडूला खेळण्याची परवानगी मिळण्याची वाट पाहत आहे. विशेष म्हणजे ज्या खेळाडूची एवढी वाट पाहिली जात आहे तो भारतातील सर्वात वेगवान गोलंदाज आहे. अर्थात हे नाव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी किंवा मोहम्मद सिराजचं नाहीये. मग हा खेळाडू आहे तरी कोण आणि तो कोणत्या संघाकडून खेळणार आहे याच बद्दल जाणून घेऊयात...

कोण आहे हा खेळाडू?

आतापर्यंतच्या आयपीएलच्या 17 पर्वांमधून भारतीय क्रिकेटला अनेक नवीन स्टार्स मिळाले आहेत. यामध्ये सध्याच्या भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सुर्यकुमार यादवपासून ते अगदी रिंकू सिंग, श्रेयस अय्यर यासारख्या अनेकांची नावं घेता येतील. याच नावांमध्ये मागील वर्षी नव्याने भर पडली ती मयांक यादव या नावाची. मयांक यंदा लखनऊ सुपर टायटन्सच्या संघाकडून खेळणार आहे. मात्र त्याला बीसीसीआयकडून फिटनेस क्लिअरन्स मिळण्याची वाट लखनऊचा संघ पाहत आहे. मयांक सध्या बंगळुरुमध्ये सेंटर ऑफ एक्सलन्समध्ये दुखापतीनंतर सावरत सराव करत आहे. ऑक्टोबर 2024 मध्ये बांगलादेशविरुद्धच्या मालिकेत टी-20 अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर याच मालिकेत जो जायबंदी झाला होता. मयंकानेच त्याच्या इन्स्टाग्राम हॅण्डलवरुन एक व्हिडीओ शेअर केला ज्यात तो देखरेखीखाली गोलंदाजी करताना दिसत आहे.

पहिल्याच पर्वात सर्वांना केलं इम्प्रेस

आधी वेगाचा नवा बादशाह म्हणून ओळखला जाणारा मयांक आयपीएलचं सुरुवातीचे काही सामने खेळणार नाही असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र त्याने पोस्ट केलेल्या व्हिडीओनंतर लखनऊच्या संघाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. मागील आयपीएल पर्वात पदार्पण करणाऱ्या मयांकने सातत्याने 150 किमी प्रति तास वेगाने गोलंदाजी करत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. अवघ्या चार सामन्यांमध्ये त्याने सात विकेट्स घेतलेल्या. मात्र स्पर्धेच्या सुरुवातीलाच तो जखमी झाल्याने स्पर्धेतून बाहेर पडला होता. त्याने चार पैकी दोन सामन्यांमध्ये सामनावीर पुरस्कार मिळवला होता. त्याने या पर्वात 156.7 किलोमीटर प्रतितास वेगाने सर्वात जलद चेंडू टाकला होता. 

बांगलादेशविरुद्ध दमदार कामगिरी

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही मयांकने बांगलादेशविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये चार विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर जो जखमी झाल्याने मैदानापासून दूरच आहे. लखनऊच्या संघाने 11 कोटींची किंमत मोजत मयांकला संघात रिटेन केलं आहे. तो 2024 चं पर्व लखनऊच्या संघाकडून अनकॅप खेळाडू म्हणून अवघ्या 20 लाखांमध्ये खेळला होता.

Read More