Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ऋषभ पंतची धमाकेदार खेळी, इंडिया ए टीमचा दणदणीत विजय

इंडिया ए टीमचा सलग चौथा विजय

ऋषभ पंतची धमाकेदार खेळी, इंडिया ए टीमचा दणदणीत विजय

तिरुवनंतपूरम : युवा विकेटकीपर ऋषभ पंत (Rishabh Pant) च्या अर्धशतकाच्या जोरावर इंडिया 'ए' (India A) टीमने इंग्‍लंड लायंस (England Lions)ला ६ विकेटने पराभूत केलं. या सामन्यात पंतने ७६ बॉलमध्ये ७३ रनची खेळी करत ६ फोर आणि ३ सिक्सच्या मदतीने भारतीय टीमला विजयाच्या उंबरट्यावर आणून ठेवलं. यामुळे भारताने २२२ रनचं लक्ष्य सहज गाठलं. इंडिया 'ए' टीमची इंग्‍लंड लायंसच्या विरुद्ध हा लागोपाठ चौथा विजय आहे.

तिरुवनंतपूरममध्ये झालेल्या या सामन्यात इंग्‍लंड लायंसने आधी बॅटिंग करत ५० ओव्हरमध्ये ८ विकेट गमवत २२१ रन केले होते. ओली पोपने या सामन्यात १०३ बॉलमध्ये ६५ रन तर स्टीवन मुलानीने ५४ बॉलमध्ये ५८ रन केले होते. भारताकडून शार्दुल ठाकुर याने ४९ रन देत ४ विकेट घेतल्या. ५५ रनवरच इंग्लंड लायंसने ४ विकेट गमवल्या होत्या. पण त्यानंतर पोप आणि स्टीवनने खेळ सावरला.

इंडिया ए टीमने ४६.३ ओव्हरमध्ये ४ विकेट गमवत विजय मिळवला. या सामन्यात केएल राहुलने ७७ बॉलमध्ये ४२ रन केले. पंत  (Rishabh Pant) ने दीपक हुडासोबत १२० रनची पार्टनरशिप केली. हुडाने ४७ रन केले. इंग्‍लंडच्या विल जॅक्‍सने ३५ रन देत २ विकेट घेतले. सिरीजमधील शेवटचा आणि पाचवा सामना गुरुवाळी खेळला जाणार आहे.

Read More