India Beat England 1st Time At Edgbaston Birmingham: भारताने बर्मिंगहॅमच्या एजबेस्टन मैदानावर टेस्ट क्रिकेटमधील एक सुवर्णक्षण अनुभवला. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इंग्लंडला 336 धावांनी पराभूत करत मैदानावर पहिल्यांदाच विजयाची नोंद केली. लीड्समधला पहिला कसोटी सामना जिंकून इंग्लंडने 1-0 अशी आघाडी घेतली होती. पण आता भारतीय संघाने दुसरा सामना जिंकून मालिका 1-1 अशी बरोबरीत आणली आहे. ही केवळ मालिका बरोबरीची नसून, भारतीय क्रिकेटच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला आहे.
या सामन्यात शुभमन गिलने एकाच वेळी फलंदाज आणि कर्णधार म्हणून आपली योग्यता सर्वांसमोर सिद्ध केली आहे. पहिल्या डावात त्याने 269 धावांची भक्कम खेळी केली. त्यावेळी त्याचे त्री शतक थोडक्यात चुकले. तर दुसऱ्या डावातही तो 161 धावाकरून संघाच्या पाठीशी उभा राहिला. एकाच टेस्टमध्ये डबल सेंच्युरी आणि शतक ठोकणारा तो दुसरा भारतीय ठरला आहे.
हे ही वाचा: IND vs ENG: 'Gill' Done India... भारताचा परदेशातील सर्वात मोठा विजय; मालिका 1-1 च्या बरोबरीत
runs in the 1st Innings
— BCCI (@BCCI) July 6, 2025
runs in the 2nd Innings
For his phenomenal batting and record breaking innings in the second Test, Captain Shubman Gill is the Player of the Match
Scorecard https://t.co/Oxhg97g4BF #TeamIndia | #ENGvIND | @ShubmanGill pic.twitter.com/vjmdn7xce8
एजबेस्टनमध्ये याआधी अनेक दिग्गज भारतीय कर्णधार पराभव पत्करून परतले होते. मंसूर अली खान पटौदीपासून विराट कोहलीपर्यंत सर्वांनी पराभवाचे चटके सोसले. केवळ कपिल देव यांनी 1986 मध्ये सामना ड्रॉ केला होता. पण शुभमन गिल याने 2025 मध्ये या मैदानावर विजय खेचून आणत इतिहासात आपले नाव कोरले होते.
1967 – मंसूर अली खान पटौदी – 132 धावांनी पराभव
1974 – अजीत वाडेकर – डाव व 78 धावांनी पराभव
1979 – वेंकटराघवन – डाव व 83 धावांनी पराभव
1986 – कपिल देव – सामना ड्रॉ
1996 – मोहम्मद अजहरुद्दीन – 8 गड्यांनी पराभव
2011 – महेंद्रसिंह धोनी – डाव व 242 धावांनी पराभव
2018 – विराट कोहली – 31 धावांनी पराभव
2022 – जसप्रीत बुमराह – 7 गड्यांनी पराभव
2025 – शुभमन गिल – 336 धावांनी विजय
हे ही वाचा: IND vs ENG 2nd Test: आकाशदीपच्या एका जादुई चेंडूवर बोल्ड झाला जो रूट, पाहा धमाकेदार Video
हा विजय केवळ एका सामन्याचा निकाल नाही, तर अनेक पिढ्यांच्या प्रतिक्षेचा शेवट होता. गिलने केवळ फलंदाजीनेच नाही, तर त्याच्या नेतृत्वगुणांचेही दर्शन घडवले आहे. धोनी-विराट जिथे जिंकू शकले नाही, तिथे शुभमन गिलने इतिहास घडवला असे म्हंटले तरी वावगे ठरणार नाही.