Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

ICC Rankings: भारत तिन्ही फॉरमॅटचा 'बादशाह', वनडे, टी-ट्वेंटीनंतर आता कसोटीतही टीम इंडिया नंबर 1

ICC Rankings:  नागपुरमध्ये टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाला पराभूत करून भारताने आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलं आहे.

ICC Rankings: भारत तिन्ही फॉरमॅटचा 'बादशाह', वनडे, टी-ट्वेंटीनंतर आता कसोटीतही टीम इंडिया नंबर 1

ICC Rankings : बॉर्डर गावस्कर मालिकेतील भारत आणि ऑस्ट्रेलिया (INDvs AUS) यांच्यातील पहिल्या सामन्यात भारताने एक डाव आणि 132 धावांनी विजय मिळवला. भारताच्या या घवघवीत यशानंतर आता टीम इंडियाला खुशखबर मिळाली आहे. टीम इंडिया आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये (ICC Test Rankings) नंबर-1 टीम बनली आहे. आज जाहीर झालेल्या कसोटी संघाची क्रमवारी अपडेटनुसार ही माहिती समोर आली आहे. (India becomes world no 1 test side in latest icc team rankings know details)

आयसीसीने जाहीर केलेल्या क्रमवारीनुसार (Latest ICC Rankings) 115 रँकिंगसह भारत पहिल्या स्थानी विराजमान झाला आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर 111 गुणांसह ऑस्ट्रेलियाचा (Australia) संघ आहे. तर त्यापाठोपाठ इंग्लंडने (England) 106 रँकिंगसह पाठलाग करतोय. तर न्यूझीलंड (New Zealand) चौथ्या स्थानी तर वेस्ट इंडिज पाचव्या स्थानी आहे.

एकूण 32 सामन्यात 3690 गुण टीम इंडियाने कमावले आहेत. तर 29 सामन्यात इंग्लंडने 3231 गुण कमावले आहेत. तर सर्वाधिक 47 सामने खेळलेल्या इंग्लंडच्या खात्यात 4973 गुण आहेत. रोहित (Rohit Sharma) हा जगातील पहिला कर्णधार बनला आहे, ज्याच्या नेतृत्वाखाली संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये संघ नंबर-1 ठरलाय.

आणखी वाचा - Chetan Sharma Sting Operation: टीम इंडियामध्ये 'इंजेक्शन खेळ'... चेतन शर्मा यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट!

दरम्यान, सध्या टी-20 संघाचा (T20) कर्णधारपद हार्दिक पांड्याकडे असतं तरी वनडे (ODI) आणि कसोटी संघाची (Test) कमान रोहित शर्माकडे आहे. त्यामुळे तिन्ही फॉरमॅटची बादशाहत भारताकडे असल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे आता आगामी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपसाठी (World Test Championship) भारत मालिका खिश्यात घालणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.

Read More