Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

...अन् विराट बाथरुममध्ये ढसाढसा रडला! 'त्या' मॅचचा उल्लेख करत खळबळजनक खुलासा

Virat Kohli Crying In Bathroom: विराट कोहली आयपीएल जिंकल्यानंतर मैदानातच भावूक होऊन रडल्याचा संदर्भ देत यापूर्वी असं कधी झालं होतं का असा प्रश्न विचारण्यात आला.

...अन् विराट बाथरुममध्ये ढसाढसा रडला! 'त्या' मॅचचा उल्लेख करत खळबळजनक खुलासा

Virat Kohli Crying In Bathroom: भारतीय क्रिकेट संघातील फिरकीपटू युझवेंद्र चहलने राज शमानीच्या यूट्यूब चॅनेलवरील पॉडकास्टमधील मुलाखतीची सध्या सर्वत्र चर्चा आहे. भारताच्या या हरहुन्नरी फिरकी गोलंदाजाने मुलाखतीमध्ये विविध विषयांवर भाष्य केले आहे. चहलने या मुलाखतीमध्ये घटस्फोटासंदर्भात केलेल्या विधानांच्या बातम्या आणि चर्चा झाल्या. चहलने त्यांच्या पाच वर्षांच्या वैवाहिक जीवनात काय चूक झाली याबद्दल उघडपणे भाष्य केलं. पूर्वाश्रमीची पत्नी धनश्री वर्मासोबतच्या नात्यातील गोंधळाबद्दल तो मुक्तपणे बोलला. मात्र या मुलाखतीमध्ये चहलने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील काही किस्से सांगितले. अनेक सहकाऱ्यांबद्दलही तो बोलला.

रोहित आणि विराटची तुलना करताना काय म्हणाला?

चहलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीबद्दलही मुलाखतीमध्ये मतप्रदर्शन केलं. विराट कोहली आणि रोहित शर्माबद्दल चहल भरभरुन बोलला. पॉडकास्टमध्ये बोलताना चहलने रोहित आणि विराटच्या नेतृत्व गुणांची तुलनाही केल्याचं पाहायला मिळालं. "रोहित भैयाचे पाय आजही जमिनीवर आहेत. हे मला फार आवडते. तो खूप चांगला कर्णधार आहे. विराट भैयाबद्दल बोलायचं झालं तर तो दररोज तीच ऊर्जा घेऊन येतो. त्याच्या ऊर्जेचा दर्जा हा फक्त उत्तरोत्तर वाढत जातो आणि त्याची ऊर्जा कधीच कमी होत नाही," असं चहल या दोन दिग्गजांबद्दल म्हणाला.

विराटच्या रडण्यासंदर्भात प्रश्न

युझवेंद्र चहलने विराट कोहलीला मी 'बाथरूममध्ये रडताना पाहिले आहे,' असंही म्हटलंय. चहलने 2019 च्या विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या सेमीफायनलमधील पराभवाबद्दलही भाष्य केले, हा सामना राखीव दिवशी खेळवावा लागला होता. तू कधी कोहलीला रडताना पाहिले आहे का? असा प्रश्न चहलला मुलाखतीदरम्यान विचारण्यात आला. अलिकडेच आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्याl विराट भावूक होऊन रडल्याचा संदर्भ देत हा प्रश्न विचारण्यात आला.

नक्की वाचा >> पत्नीमुळे आत्महत्येचे विचार, भारतीय क्रिकेटचा गौप्यस्फोट! म्हणाला, 'रोज 2 तास रडायचो, फक्त...'

तेव्हा विराट रडत होता

“2019 च्या विश्वचषकात मी त्याला बाथरूममध्ये रडताना पाहिले आहे,” असं चहल मुलाखतीत म्हणाला. “मी शेवटचा फलंदाज होतो, जेव्हा मी मैदानात फलंदाजीला जाण्यासाठी त्याच्या बाजूने गेलो तेव्हा त्याच्या डोळ्यात अश्रू होते. 2019 मध्ये, मी विराटसहीत सर्वांनाच ड्रेसिंग रुममधील बाथरूममध्ये रडताना पाहिले आहे,” असं तो पुढे म्हणाला. त्या दिवशी भारतीय संघाला पराभवाचा केवढा धक्का बसला होता हे त्याने अधोरेखित केले.

नक्की वाचा >> चहल अन् धनश्रीकडून लग्नाचा, संसाराचा बनाव! स्वत: खुलासा करत म्हणाला, 'तिला आवडेल ते..'

पत्नीसंदर्भात काय खुलासा केला?

याच मुलाखतीदरम्यान, धनश्रीसोबत घटस्फोटाची चर्चा काही काळापासून सुरू होती, परंतु आम्ही ती जाणीवपूर्वकपणे सार्वजनिक केली नव्हती अशी कबुलीही चहलने दिली. चहलवर धनश्रीची फसवणूक केल्याचा आरोप देखील झाला होता. मात्र हे आरोप खोटे असून मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाचीही फसवणूक केली नाही, असं चहलने सांगितलं. 

Read More