Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Cricket : LORD'S वर भारतीय टीम ठरली लॉर्ड, यजमान इंग्लंडचा उडवला धुव्वा

या विजयाबरोबर भारतीय क्रिकेट संघाने भारतीयांना 75व्या स्वातंत्र्यदिनाचं गिफ्ट दिलं आहे

Cricket : LORD'S वर भारतीय टीम ठरली लॉर्ड, यजमान इंग्लंडचा उडवला धुव्वा

लॉर्ड्स : लॉर्ड्स कसोटी सामन्यात भारताने यजमान इंग्लंडवर 151 धावांनी दणदणीत मात केली आहे. या विजयाबरोबर भारताने 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 272 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण भारतीय गोलंदाजांच्या वेगवान माऱ्यासमोर इंग्लंडची संपूर्ण टीम अवघ्या 120 धावांवर ऑलआऊट झाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभारु शकला नाही. 

भारतातर्फे मोहम्मद सिराजने सर्वाधिक 4 विकेट घेत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. तर जसप्रीत बुमराहने 3 विकेट घेतल्या. तर ईशांत शर्माने दोन आणि मोहम्मद शमीने एक विकेट घेतली.

Read More