Why Rishabh Pant Was Setting Field For Bangladesh: भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत चेन्नईमधील बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर चर्चेत आहे. दमदार शतकी खेळीबरोबर सामन्याच्या चौथ्या दिवशी घडलेल्या एका प्रकारामुळे पंत इंटरनेटवर चांगलाच चर्चेचा विषय ठरला. तिसऱ्या दिवशी घडलेल्या याच प्रकारावरुन समालोचक साबा करीम यांनी ऋष पंतला तू बांगलादेशचा कर्णधार आहेस की नमुल्ला हुसैन शांतो? असा प्रश्न विचारला. हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे फलंदाजी करत असताना पंत चक्क शांतोला बांगलादेशच्या संघाची फिल्डींग लावण्यासाठी मदत करत होता. स्वत:विरुद्ध स्वत: फिल्डींग लावणारा पंत हा कदाचित पहिलाच क्रिकेटपटू असेल असं अनेकांनी हे दृश्य पाहिल्यानंतर म्हटलं. मात्र आपण बांगलादेश संघासाठी फिल्डींग का लावत होतो याचा खुलासा पंतनेच केला आहे.
पहिल्या कसोटीनंतर पंतबरोबर चर्चा करताना साबा करीमने, "दुसऱ्या डावामध्ये तस्कीन अहमद गोलंदाजी कर होता त्यावेळी तू का फिल्डींग सेट करत होता? बांगलादेशचा कर्णधार कोण आहे शांतो की ऋषभ पंत? त्याने तर तुझं ऐकलंही, असं का?" असा प्रश्न विचारला. पंतने यावर काय उत्तर दिलं त्यापूर्वी पंताचा हा बांगलादेशच्या फिल्डींग लावतानाचा व्हिडीओ एकदा पाहून घ्या...
Always in the captain’s ear, even when it’s the opposition’s!
— JioCinema (@JioCinema) September 21, 2024
Never change, Rishabh Pant! #INDvBAN #IDFCFirstBankTestSeries #JioCinemaSports pic.twitter.com/PgEr1DyhmE
"सर्वात आधी मी हे सांगेन की माझं अजय भाईंशी अगदी ऑफ द फिल्ड गप्पा होतात तेव्हा हेच बोलणं होतं की क्रिकेट उत्तम दर्जाचं असलं पाहिजे. मग ते कुठेही खेळो आणि कोणीही खेळो मग ते अगदी विरोधी संघ असो किंवा तुम्ही स्वत: खेळत असाल," असं पंत म्हणाला. आपण बांगलादेशची फिल्डींग का लावली याबद्दल बोलताना पंतने, "त्या ठिकाणी फिल्डर नव्हता. दोन फिल्डर एकाच ठिकाणी उभे होते. तेव्हा मी त्याला सांगितलं की एक फिल्डर इथे उभा कर," असं सांगितलं.
Pant on viral moment pic.twitter.com/orWa1Si7vU
— PantMP4. (@indianspirit070) September 22, 2024
पंत बांगलादेशविरुद्धच्या कसोटीमध्ये पहिल्या दिवशी फलंदाजीला आला तेव्हा भारताची स्थिती 34 वर 3 गडी बाद अशी होती. त्याने एकट्याने 39 धावा केल्या. दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावलं. याबद्दल बोलताना पंतने सामन्यानंतर बोलताना शतक झळकावल्यानंतर आपण भावनिक झालो होतो असं सांगितलं. "मला प्रत्येक सामन्यात धावा करायच्या आहेत. मात्र कसोटीमध्ये पुनरागमन करणं माझ्यासाठी फार भावनिक होतं. मी कसोटीत समणारा आहे. मी फलंदाजीचा आनंद घेतला. शतक झळकावल्यानंतर मी थोडा भावूक झालो. मात्र सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मला मैदानात उतरल्यानंतर समाधान मिळतं. मी माझ्या पद्धतीने परिस्थिती समजून घेत खेळ करतो," असं पंत म्हणाला.