WCL 2025 : वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 मध्ये पाकिस्तान विरुद्ध सेमी फायनल सामना खेळण्यास भारतीय संघाने नकार दिला होता. त्यानंतर आता भारताने अधिकृतपणे स्पर्धेतून माघार घेतली आहे. ज्यामुळे पाकिस्तान आता थेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचला आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार समोर आलं होतं की भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशातील तणावपूर्ण संबंध आणि पहलगाम हल्ल्याच्या पाश्वभूमीवर भारतीय खेळाडू पाकिस्तान विरुद्ध सामन्यावर बहिष्कार घालू इच्छित होते. सूत्रांनी इंडिया टुडेला माहिती दिली होती की भारतीय संघ पाकिस्तान विरुद्धच्या ग्रुप स्टेज सामन्याप्रमाणे सेमी फायनल सामन्यावर सुद्धा बहिष्कार घालू इच्छितो.
31 जुलै रोजी एजबॅस्टन क्रिकेट ग्राउंडवर भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात सेमीफायनल सामना होणार होता. परंतु सामन्याच्या आदल्या दिवशी, भारतीय संघाच्या स्पॉन्सरपैकी एक, EaseMyTrip ने दहशतवाद आणि क्रिकेट हातात हात घालून चालू शकत नाही असे सांगून उपांत्य फेरीच्या सामन्यातून माघार घेतली.
एक्स या सोशल मीडियावर कंपनीने जाहीर केलेल्या एका निवेदनात म्हटले की, कंपनीचे संस्थापक निशांत पिट्टी म्हणाले की, वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये पोहोचल्याबद्दल ते इंडिया चॅम्पियन्सचे कौतुक करतात, परंतु पाकिस्तानचा सहभाग असलेल्या सामन्यांशी स्पॉन्सर म्हणून ते जोडले जाऊ इच्छित नाहीत.
The Indian team (India Champions) at the WCL has officially withdrawn from the tournament after the players refusal to play the semifinal game against Pakistan. The ECB is being conveyed about the decision, which means Pakistan will progress to the final of the WCL this year.
Rahul Rawat (rawatrahul9) July 30, 2025
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स 2025 या स्पर्धेच्या सुरुवातीला, अनेक खेळाडूंनी सामन्यातून माघार घेतल्याने भारतीय संघाला पाकिस्तानविरुद्धचा ग्रुप स्टेज सामन्यातून माघार घ्यावी लागली होती. शिखर धवन आणि हरभजन सिंग हे प्रमुख खेळाडू होते ज्यांनी हा पाकिस्तान विरुद्ध सामन्यावर बहिष्कार टाकला होता.
हेही वाचा : शेवटच्या टेस्ट सामन्यात पाऊस बनणार व्हिलन? कसं असणार लंडनचं हवामान? पाहा Weather Reports
काहीच दिवसांपूर्वी आशिया कप 2025 चं शेड्युल जाहीर करण्यात आलं असून त्यानुसार 9 ते 28 सप्टेंबर दरम्यान स्पर्धा पार पडणार आहे. यात पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तान विरुद्ध क्रिकेट सामना खेळू नये अशी मागणी केली जात असताना सुद्धा भारत आणि पाकिस्तान यांचा एकाच ग्रुपमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तसेच भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 सप्टेंबर रोजी सामना सुद्धा होणार आहे.