Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

पाकिस्तानचे 150000000000 रुपये पाण्यात, भारताच्या मिसाइलने रावळपिंडी स्टेडियमची झालीय 'अशी' अवस्था!

India Pakistan War: चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधी खर्च करुन रावळपिंडी मैदानाचेही नुतनीकरण करण्यात आले होते

पाकिस्तानचे 150000000000 रुपये पाण्यात, भारताच्या मिसाइलने रावळपिंडी स्टेडियमची झालीय 'अशी' अवस्था!

India Pakistan War: काही दिवसांपुर्वी पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे आयोजन करण्यात आले होते. 29 वर्षांनंतर पाकिस्तानमध्ये आयसीसीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याआधी शेवटचा आयसीसी कार्यक्रम 1996 मध्ये पाकिस्तानमध्ये आयोजित करण्यात आला होता. असे असले तरी टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दिला. त्यामुळे भारताचे सर्व सामने दुबईमध्ये आयोजित करण्यात आले होते. चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधी खर्च करुन रावळपिंडी मैदानाचेही नुतनीकरण करण्यात आले होते. पण आधीच तिथे कमी सामने खेळवले गेले. त्यात भारताच्या मिसाइलने ते उद्धस्त झालंय. पाकिस्तानचे पैसे पाण्यात गेल्याचे म्हटलं जातंय. याबद्दल जाणून घेऊया. 

टीम इंडिया अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर दुबईमध्ये विजेतेपदाचा सामनाही झाला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडला हरवून टीम इंडियाने 12 वर्षांनंतर चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद पटकावले. चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित करण्यासाठी पाकिस्तानने लाहोर, कराची आणि रावळपिंडी येथील त्यांच्या 3 स्टेडियमचे नूतनीकरण करण्यात आले. यासाठी पाकिस्तानने कोट्यवधी रुपये खर्च केले.

रावळपिंडीच्या नूतनीकरणासाठी किती कोटी रुपये खर्च झाले?

रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमच्या नूतनीकरणासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 1500 कोटी रुपये खर्च केल्याचे वृत्त आहे. जर आपण हे भारतीय रुपयांमध्ये पाहिले तर ही रक्कम 450 कोटी रुपये इतकी आहे. पण इतके नूतनीकरण करूनही चॅम्पियन्स ट्रॉफी दरम्यान या मैदानावर 600 चेंडूही खेळवण्यात आले नाहीत. बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यातील फक्त एकच सामना येथे पूर्णपणे खेळवण्यात आला. बांगलादेशने 50 षटकांत फलंदाजी केल्यानंतर 9 गडी गमावून 236 धावा केल्या. न्यूझीलंडने 237 धावांचे लक्ष्य फक्त 46.1 षटकांत 5 गडी बाद करत पूर्ण केले.

याशिवाय येथे आणखी दोन सामने होणार होते. पण पावसामुळे दोन्ही सामने एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आले. एक सामना ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आणि दुसरा सामना पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात खेळवला जाणार होता. 2025 ची चॅम्पियन्स ट्रॉफी मोहीम पाकिस्तानसाठी खूपच निराशाजनक होती. यजमान पाकिस्तान संघ एकही सामना न जिंकता गट टप्प्यात बाहेर पडला.

Read More