Marathi News> स्पोर्ट्स
Advertisement

Service आणि Smash.... राष्ट्रपतींचे बॅडमिंटन Skill पाहून सायना नेहवाल अवाक्; पाहा Video

Droupadi Murmu Badminton: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा खेळ पाहून सायना नेहवाल आवाक् झाली. 

Service आणि Smash.... राष्ट्रपतींचे बॅडमिंटन Skill पाहून सायना नेहवाल अवाक्; पाहा Video

Droupadi Murmu Badminton: सायना नेहवाल ही टीम इंडियाची सर्वोत्तम बॅडमिंटनपटू आहे. तिने ऑलिंपिक खेळात उपांत्यपूर्व फेरी गाठलीय. तसेच जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धा जिंकलीय. असे करणारी सायना ही पहिली भारतीय महिला बॅटमिंटनपट्टू ठरली. अशा या सायना नेहवालसमोर बॅडमिंटन कोर्टात एक खास व्यक्ती होती. ती व्यक्ती म्हणजे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू. राष्ट्रपती आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत बॅडमिंटन कोर्टवर दिसल्या. त्यांचा खेळ पाहून सायना नेहवाल आवाक् झाली. याचा एक व्हिडीओ समोर आलाय.

राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि बॅडमिंटनपट्टू सायना नेहवाल यांच्यात सामना रंगलेला दिसला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासमोर जिंकण्यासाठी सायना नेहवाल संघर्ष करताना दिसली. राष्ट्रपतींच्या एक्स हॅंडलवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. तसेच काही फोटोदेखील शेअर करण्यात आले आहेत. 

राष्ट्रपती भवनात बॅटमिंटन कोर्टवर सायना नेहवाल सोबत खेळणाऱ्या  द्रौपदी मुर्मू यांचे खेळाप्रती प्रेम, असे कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आलंय.  बॅडमिंटन खेळाला ताकद देण्याच्या उद्देशाने राष्ट्रपतींनी हा व्हिडीओ शेअर केल्याचे म्हटले जाते.  

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि सायना दोघीही खेळ एन्जॉय करताना व्हिडीओमध्ये दिसत आहे. हे फोटो सोशल मीडियात व्हायरल होत असून फोटो ऑफ द डे अशा कमेंट्स यावर येत आहेत. भारतीय बॅडमिंटनपट्टू सायना नेहवाल हिला पद्मश्री आणि पद्मभूषणने सम्मानित करण्यात आले आहे.

Read More